Paneer Bread Pakora : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या-घरी तयार करा खास पनीर ब्रेड पकोडे, पाहा रेसिपी!
पकोडा म्हटल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येते. त्यामध्येही सध्याच्या थंडीच्या वातावरणात मस्त गरमा-गरम पकोडे खाण्याची मजा वेगळीच आहे. आज आम्ही तुम्हाला एक खास पकोडा रेसिपी सांगणार आहोत. दरवेळीचाच ब्रेड पकोडे खाऊन कंटाळा आला असेल तर हा खास पनीर ब्रेड पकोडा नक्की करून पाहा.
मुंबई : पकोडा म्हटल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येते. त्यामध्येही सध्याच्या थंडीच्या वातावरणात मस्त गरमा-गरम पकोडे खाण्याची मजा वेगळीच आहे. आज आम्ही तुम्हाला एक खास पकोडा रेसिपी सांगणार आहोत. दरवेळीचाच ब्रेड पकोडे खाऊन कंटाळा आला असेल तर हा खास पनीर ब्रेड पकोडा नक्की करून पाहा. चला तर जाणून घेऊयात या खास पकोड्याची रेसिपी.
पनीर ब्रेड पकोड्यासाठी साहित्य
किसलेले पनीर – 1 कप
उकडलेले मटार – 1/4 कप
किसलेले गाजर – 1 कप
लाल तिखट – 1 टीस्पून
बेसन – 1 कप
ब्रेड – 8
आवश्यकतेनुसार मीठ
तेल – 1 कप
हळद – 1/2 टीस्पून
हिंग – 1 टीस्पून
चिरलेली कोथिंबीर – 2 टीस्पून
काळी मिरी – 1 टीस्पून
पनीर ब्रेड पकोडे तयार करण्याची पध्दत-
स्टेप – 1
पनीर, मटार, गाजर, धने, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद आणि मीठ एका भांड्यात चांगले मिक्स करून घ्या.
स्टेप – 2
ब्रेड घ्या आणि त्यावर हे मिश्रण एक सारखे पसरवा. स्टफिंगच्या वर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा आणि हलके दाबून बंद करा. आता स्टफिंगसह ब्रेड स्लाइसचे दोन समान भाग करा.
स्टेप – 3
बेसन, 1 कप पाणी, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट, मीठ आणि हिंग एका भांड्यात चांगले मिक्स करा. गुळगुळीत पीठ बनवण्यासाठी मिश्रण हलक्या हाताने फेटा. आता ब्रेडचे तुकडे पिठात बुडवा.
स्टेप – 4
पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात ब्रेडचे टाका. ते हलके तपकिरी होईपर्यंत तळा. अशाप्रकारे सर्व पकोडे तळून घ्या.
स्टेप – 5
संपूर्ण पकोडे तळून झाल्यावर प्लेटमध्ये ठेवा आणि पुदिन्याची चटणी चटणीसोबत सर्व्ह करा.
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!