Mental Health : रात्री झोप लागत नाहीय?, मग दैनंदिन आयुष्यात ‘हे’ बदल नक्की करा
आपल्या सर्वांना माहित आहे की, चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीने 7 ते 8 तासांची झोप घ्यावी. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.
मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की, चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीने 7 ते 8 तासांची झोप घ्यावी. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे गंभीर आजार उद्भवू शकतात. एवढेच नाही, पुरेशी झोप न मिळाल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. कोरोना कालावधीत झोपेची समस्या अधिक वाढली आहे, जर तुम्हालाही झोप न लागण्याची समस्या निर्माण झाली असेल तर आपण खालील टिप्स फाॅलो करून झोपेची समस्या दूर करू शकता. (Make these changes in your daily life to get a good night’s sleep)
मेडिटेशन
मेडिटेशन करणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. रिकाम्या जागी बसून दीर्घ श्वास घ्या. आपले डोळे बंद करा आणि श्वास घ्या. आपण ही प्रक्रिया दररोज 5 ते 20 मिनिटांसाठी करू शकता. हे ताण कमी करते आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवते. मेडिटेशन केल्याने आपल्याला रात्री झोप येते आणि कोणत्याही तणावाशिवाय आपण आराम करू शकता.
मंत्र आणि जप
मन शांत ठेवण्यासाठी मंत्र आणि जप करणे फायदेशीर आहे. जप आणि मंत्र केल्यास मानसिक ताण कमी होतो. रात्रीच्या वेळी झोप येत नसेल तर मंत्र जप करा. जर तुम्हाला कोणताही मंत्र येत नसेल तर ओमचा जप करावा. यामुळे आपणास बरे वाटेल आणि रात्री झोप व्यवस्थित येते.
योगा करा
योगा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आपल्या स्नायूंला आराम देते तसेच मन शांत ठेवते. रात्रीच्या वेळेस झोप नसेल येत तर दररोज 20 मिनिटे योगा करा. विशेष म्हणजे योगा केल्याने आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते.
लठ्ठपणा वाढतो
संशोधनात असेही समोर आले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती पुरेशी झोपू शकत नाही, तेव्हा शरीरात घ्रेलिन संप्रेरक वाढतो आणि लेप्टिन संप्रेरकाची कमतरता सुरू होते. लेप्टिन भूक कमी करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो. तर, घ्रेलिन एक वेगाने वाढणारे हार्मोन आहे, जे भूक वाढवते आणि वजन वाढण्यास सुरूवात होते.
संबंधित बातम्या :
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Make these changes in your daily life to get a good night’s sleep)