विवाहित पुरुषांनी अशी वाढवा ‘ताकद’… काळ्या तिळाचा असा करा वापर…

लग्नानंतर प्रत्येक पुरुषांची इच्छा असते, की त्यांचे आपल्या जोडीदारासोबतचे लैंगिक जीवन चांगले जावे, आपल्या नात्यात कुठल्याही कारणामुळे तणाव निर्माण होउ नये. तसेच कोणत्याही प्रकारची पुरुषी कमजोरी येऊ नये, तुमच्याही मनात ही शंका असेल तर तुम्ही दुधासोबत खास काळ्या तिळाचा आहारात समावेश करु शकतात.

विवाहित पुरुषांनी अशी वाढवा ‘ताकद’... काळ्या तिळाचा असा करा वापर...
विवाहित पुरुषांनी दररोज काळ्या तिळाचे सेवन करणे फायदेशीरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 10:48 AM

दुधाला (milk) भारतीय खाद्य संस्कृतीत पूर्ण अन्न म्हटले जाते. दुधाचा रोज आहारात समावेश केल्याने शरीराला अनेक फायदेही होत असतात. त्यामुळे दुधाच्या सेवनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. तरीदेखील अनेक वेळा फक्त दूध न घेता, त्यात हळद, बदाम तसेच केशर मिसळून त्याची गुणवत्ता अधिक वाढविण्याचा प्रयत्न केला जात असतो. परंतु त्यासोबत अजून एक असा घटक आहे, जो दुधात टाकल्यास त्याचे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात; तो पदार्थ म्हणजे काळे तीळ…(Nigella Seeds) काळ्या तिळाचे दूध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशिर समजले जाते. काळ्या तिळात अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह, तांबे, फॉस्फरस आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पुरुषी ताकद तर वाढतेश शिवाय गरोदर महिलांपासून तर अबालवृध्दांनादेखील याचे भरपूर आरोग्यदायी फायदे (health benefits) आहेत.

काळ्या तिळाचे फायदे

1. पुरुषांची ताकद वाढते

काळे तीळ टाकून दूध पिल्यास विवाहित पुरुषांची पुरुषी ताकद वाढून कमजोरी दूर होण्यास मदत होते. याशिवाय प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत होत असते. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट लैंगिक क्षमता वाढविण्याचे काम करतात.

2. रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

काळ्या तिळाच्या दुधामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असते. ते प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्याच्या अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे ते संधिसाधू रोगांपासून देखील आपले रक्षण करते.

3. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी काळ्या तिळाच्या दुधाचा प्रचंड फायदा होतो. हे शरीराची चयापचय वाढवते आणि पचनासदेखील मदत करते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर ती देखील यातून दूर होत असते.

4. गर्भवती महिलांसाठी आरोग्यदायी

गर्भवती महिलांनाही काळ्या तिळाचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण संतूलित राहत असते. गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या हाडांचा विकास होण्यास मदत होते.

5. हृदयासाठी फायदेशीर

काळे तीळ हे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. जर दररोज सुमारे 10 ते 12 काळे तीळ दुधासह घेतल्यास हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.

6. बघण्याची क्षमता वाढते

काळ्या तिळाचे नियमितपणे सेवन केल्याने आपली दृष्टी चांगली होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त ज्यांना डोळ्यांची समस्या किंवा वारंवार डोळे लाल होण्याची समस्या असते त्यांनाही आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केला पाहिजेत.

संबंधित बातम्या : 

Health Care : मक्याच्या पिठाचे आरोग्याशी संबंधित फायदे तुम्हाला माहित आहेत? जाणून घ्या हेल्दी माहिती!

Health care : किडनी स्टोनच्या त्रासाने त्रस्त आहात, जाणून घ्या ‘या’ काळात कोणती फळे खावीत आणि कोणती टाळावीत!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.