Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी पुदिना आणि तुळस अत्यंत फायदेशीर!
वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या बनले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम केले जातात. मात्र, तरीही म्हणावे तसे वजन कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास नक्की मदत होईल.
मुंबई : वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या बनले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम केले जातात. मात्र, तरीही म्हणावे तसे वजन कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास नक्की मदत होईल. यासाठी तुम्हाला दररोज सकाळी पुदिना आणि तुळशीच्या पानांचा रस घ्यावा लागेल. (Mint and basil are beneficial for weight loss)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी पुदिन्याची पाने आणि तुळशीची पाने अत्यंत फायदेशीर आहेत. हा रस घरी तयार करण्यासाठी आपल्याला सात ते आठ तुळशी आणि पुदिन्याची पाने लागणार आहेत. या पानांची बारीक पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर कोमट पाणी या पेस्टमध्ये मिक्स करा. हे मिश्रण चांगेल मिक्स करा आणि गरम असतानाच प्या. ज्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. हे पाणी आपण सतत आठ दिवस घेतले तर आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी, जिरे, धने आणि बडीशेपचे खास पेय घेतले पाहिजे. ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल. हे खास पेय घरी तयार करण्यासाठी आपण 2 चमचे जिरे, 3 चमचे धने आणि 2 चमचे बडीशेप घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि एक ग्लास पाण्यात मिक्स करा. हे गॅसवर वीस मिनिटे उकळूद्या आणि गरमा-गरम प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
हे पेय आपण दररोज सकाळीच घेतले पाहिजे. जर हे खास पेय आपण दररोज घेतले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते. जिरेमध्ये लोह, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि इतर अनेक घटक असतात जे युरीक अॅसिड नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतात. यासह, त्यात बरेच अँटीऑक्सिडेंट्स आहेत जे युरीक अॅसिडमुळे होणारी जळजळ दूर करण्यात मदत करतात. जिरे केवळ व्हिटॅमिन ई भरलेले नाही तर त्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Mint and basil are beneficial for weight loss)