दररोज सकाळी गरम पाण्यात तूप, काळी मिरी मिक्स करून प्या आणि वजन कमी करा!
वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले जातात. मात्र तरीही वजन कमी होत नाही.
मुंबई : वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले जातात. मात्र तरीही वजन कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. हे खास पेयामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. (Mix ghee and black pepper in hot water and drink it and lose weight)
हे खास पेय तयार करण्यासाठी आपल्याला 2 चमचे तुप, 4 चमचे काळी मिरी आणि 1 ग्लास पाणी लागणार आहे. हे पेय तयार करण्यासाठी आपण एक ग्लास पाणी गॅसवर गरम होण्यासाठी मंद आचेवर ठेवा. त्यानंतर या पाण्यामध्ये काळी मिरी मिक्स करून काही वेळ उकळूद्या. शेवटी या पाण्यामध्ये तुप मिक्स करा आणि गरम असतानाच प्या. हे खास पेय आपण दररोज सकाळी पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होते.
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा जिरे पावडर मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या. जिरे केवळ अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनीच भरलेले नसून ते अँटीऑक्सिडंट्सचा एक उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे. दीर्घ काळापासून लठ्ठपणामुळे होणारी जळजळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांशी जोडली गेली आहे आणि यामुळे स्वयंप्रतिकारक परिस्थिती देखील उद्भवू शकते. जिरे पाणी पाचन फायद्यासाठी देखील ओळखले जाते.
ओव्याचे पाणी पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. एका ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घालून ते पाणी उकळा. नंतर ते पाणी कोमट करून प्या. आपण इच्छित असल्यास, ते एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तयार करू शकता आणि ते एका भांड्यात ठेवू शकता. त्यानंतर, आपण दिवसभरात कधीही हे पाणी पिऊ शकता असे केल्याने, लवकरच आपल्याला चांगले परिणाम दिसतील. जर, आपण दिवसभर हे पाणी पिऊ शकत नसाल, तर किमान सकाळी रिक्त पोटी आणि जेवणानंतर नक्की प्या.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Hair Care | हिवाळ्याच्या दिवसांत कोंड्याच्या समस्येने हैराण? ‘हे’ घरगुती उपचार नक्की ट्राय करा!#haircare | #Dandruff | #HairProblems | #BeautySecrets https://t.co/CCKZp4C5hX
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021
(Mix ghee and black pepper in hot water and drink it and lose weight)