Navratri Fasting: वजन कमी करण्यासाठी ‘या’ 5 टिप्स फॉलो करा, वाचा!
नवरात्रोत्सवाची सुरूवात झाली आहे. लोक हा नऊ दिवसांचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात आणि नऊ दिवस उपवास देखील पकडतात. उपवास करण्यामागची वैज्ञानिक संकल्पना म्हणजे नियमित अन्न खाण्यापासून विश्रांती घेऊन आपले शरीर डिटॉक्स करणे आणि शुद्ध करणे.
मुंबई : नवरात्रोत्सवाची सुरूवात झाली आहे. लोक हा नऊ दिवसांचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात आणि नऊ दिवस उपवास देखील पकडतात. उपवास करण्यामागची वैज्ञानिक संकल्पना म्हणजे नियमित अन्न खाण्यापासून विश्रांती घेऊन आपले शरीर डिटॉक्स करणे आणि शुद्ध करणे. नवरात्रीमध्ये ग्लूटेन मुक्त धान्य आणि हलके पदार्थ खाण्यास प्रोत्साहन मिळते. मात्र, उपवासादरम्यान आपण नेमके काय आहारात घेतले पाहिजे. हे आपण आज बघणार आहोत.
1. आहारात भाज्या घ्या
उपवासाचा अर्थ असा नाही की तुम्ही तळलेले बटाटे आणि पुरी खात रहा. आपण पोषक तत्वांनी समृद्ध आणि पचायला सोप्या असलेल्या हिरव्या भाज्या खाण्यावर भर दिला पाहिजे. आपण घरी सलाद आणि सूप देखील बनवू शकता. यामुळे आपल्या शरीराला उपवासादरम्यान देखील ऊर्जा मिळते.
2. जेवण करताना हे लक्षात ठेवा
लहान आणि वारंवार जेवण केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. अगदी लहान जेवण करूनही तुम्ही दिवसभर पोषण आणि उत्साही राहता.
3. कमी चरबीयुक्त अन्न
उपवासादरम्यान तुम्ही एकदा किंवा दोनदा तुमची आवडती कुट्टू पुरी खाऊ शकता. परंतु जास्त चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा. फुल क्रीम दूध किंवा पनीर खाऊ नका. फळांचे सलाद देखील यादरम्यान तुम्ही खाऊ शकता.
4. स्वतःला हायड्रेटेड ठेवा
उपवासादरम्यान स्वतःला हायड्रेटेड ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. पाणी सेल्युलर स्तरावर शरीर स्वच्छ आणि डिटॉक्स करण्यास मदत करते. स्वतःला हायड्रेटेड ठेवल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. आपण आपल्या शरीराला अधिक चांगल्या प्रकारे डिटॉक्स करण्यासाठी गरम पाणी देखील पिऊ शकता.
5. व्यायाम
आपण उपवास करत आहात याचा अर्थ असा नाही की आपण व्यायाम करू नये. जर तुम्हाला उर्जा कमी वाटत असेल तर तुम्ही काही हलके व्यायाम करा. हे चरबी जमा होण्यास आणि रक्त परिसंचरण वाढण्यास मदत करेल, ज्यामुळे चयापचय क्रिया अधिक चांगली होऊ शकते आणि त्यामुळे वजन कमी होऊ शकते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Navratri Fasting, Follow these 5 tips to lose weight)