Weight Loss : वजन कमी करण्यासाठी पॅलियो डाएट फॉलो करा आणि झटपट वजन कमी करा!
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या डाएट ट्रेड्स फॉलो करतात. जर तुम्हाला निरोगी राहून वेगाने वजन कमी करायचे असेल तर तुम्ही पॅलियो डाएट फॉलो करू शकता. फळे, भाज्या, शेंगदाणे, मांस यांचा या पॅलियो डाएट समाविष्ट केला जातो.
मुंबई : वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या डाएट ट्रेड्स फॉलो करतात. जर तुम्हाला निरोगी राहून वेगाने वजन कमी करायचे असेल तर तुम्ही पॅलियो डाएट फॉलो करू शकता. फळे, भाज्या, शेंगदाणे, मांस यांचा या पॅलियो डाएट समाविष्ट केला जातो. या गोष्टींमध्ये पौष्टिक घटक देखील असतात आणि चयापचय वाढवण्यास मदत करतात. काही अभ्यासांनुसार, हा डाएट तुमचे वजन झपाट्याने कमी करतो आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. (Paleo diet is extremely beneficial for weight loss)
पॅलियो डाएट काय खावे
मांस: चिकन, बीफ, पोर्क
मासे आणि सीफूड: ट्राउट, सॅल्मन, कोळंबी, हॅडॉक, शेलफिश
अंडी: ओमेगा -3 समृद्ध अंडी निवडू शकता
भाज्या: ब्रोकोली, कांदे, गाजर, मिरपूड आणि टोमॅटो
फळे: सफरचंद, संत्री, केळी, नाशपाती, एवोकॅडो, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी
कंद: बटाटे, रताळे, सलगम
नट आणि बिया: बदाम, अक्रोड, हेझलनट, सूर्यफूल बिया, भोपळा बिया
तेल: ऑलिव्ह तेल, एवोकॅडो तेल आणि इतर
मीठ आणि मसाले: मीठ, लसूण, रोझमेरी आणि हळद इ.
काय खाऊ नये
साखर : शीतपेये, फळांचे रस, साखर, कँडी, आइस्क्रीम आणि पेस्ट्री
धान्य: ब्रेड, पास्ता, गहू, राई, बाजरी
शेंगा: बीन्स, मसूर आणि इतर शेंगा
दुग्ध पदार्थ: कमी चरबीयुक्त डेअरी उत्पादने, लोणी आणि चीज
तेल : सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल
कृत्रिम स्वीटनर आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळावेत.
पॅलियो डाएटचे फायदे
पॅलियो आहार वजन कमी करण्यास मदत करते, ग्लुकोज पातळी सुधारते, रक्तदाब नियंत्रित करते आणि दीर्घ कालावधीसाठी उपासमारीला दूर ठेवण्यास मदत करते. तथापि, कोणताही आहार घेण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हिरव्या पालेभाज्या
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात जास्तीत-जास्त प्रमाणात हिरव्या भाज्या घ्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Paleo diet is extremely beneficial for weight loss)