डेंग्यू आणि कर्करोगावर मात करण्यासाठी पपईची पाने अत्यंत फायदेशीर, वाचा!
पपई खाणे आपल्या आरोग्यासाठी जसे फायदेशीर आहे, तसेच पपईची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पपईच्या पानांचा रस पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
मुंबई : पपई खाणे आपल्या आरोग्यासाठी जसे फायदेशीर आहे. तसेच पपईची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पपईच्या पानांचा रस पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. पपईमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पपईच्या पानांचा रस शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत करते. (Papaya leaf juice is beneficial for overcoming dengue and cancer)
1. डेंग्यू झाल्यानंतर दिवसातून दोन वेळा आपण पपईच्या पानांचा रस पिलातर आपल्याला आराम मिळतो आणि प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. पपईच्या पानांत ए, सी, ई, के आणि बी ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. आपण इच्छित असल्यास, चहा, रस आणि गोळ्याच्या रूपात पपईच्या पानांचे सेवन करू शकता. पपईच्या पानांमुळे तुम्ही अनेक प्रकारचे आजार टाळू शकता.
2. कर्करोगावर मात करण्यासाठी पपईची पाने अत्यंत फायदेशीर आहेत. आपण पपईची पाने कच्ची खाऊ शकतो किंवा पपईच्या पानांचा रस तयार करून पिऊ शकतो. बऱ्याच वेळा पपईच्या पानांचा रस खूप जास्त कडू लागतो. अशावेळी आपण रसामध्ये थोडी साखर मिक्स करून देखील पिऊ शकतो.
3. पपईच्या पानांचा रस घरी तयार करण्यासाठी आपण चार ते पाच कवळी पपईची पाने घ्या आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी मिक्स करा. त्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या रसामध्ये पाणी थोडे जास्त टाका. यामुळे कडूपणा कमी होण्यास मदत होईल. पपईच्या पानांचा रस नेहमी ताज्या पानांचाच असला पाहिजे. एकदाच रस तयार करून ठेऊ नका.
4. पपईच्या पानांचे सेवन केल्याने गॅस, जळजळ, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या निर्माण होत नाही. पपईत भरपूर फायबर असते, जे आपले पचन मजबूत करण्यास मदत करते. तसेच पपई आपल्या शरीरात प्रथिने पचवण्यात मदत करतो, ज्यामुळे अन्न चांगले पचते.
5. पपईच्या पानांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. ते गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासारख्या आजारांमध्ये खूप प्रभावी आहेत. पपईची पाने जीवाणू आणि संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी आहेत. ते रक्तातील पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट वाढवण्यात देखील मदत करतात.
6. सध्याच्या कोरोना काळात आपण पपईच्या पानांचा रस दररोज घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सकाळी किंवा संध्याकाळी आपण रस घेऊ शकतो. दुपारी पपईच्या पानांचा रस घेणे टाकाच.
(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Papaya leaf juice is beneficial for overcoming dengue and cancer)