Benefits of Pistachio : पिस्ता खाण्याचे ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे!
पिस्ता हे एक ड्रायफ्रूट आहे. जे शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी तसेच आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप चांगले मानले जाते. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट्स, अमीनो अॅसिड, जीवनसत्त्वे अ, के, सी, बी -6, डी आणि ई, प्रथिने, कॅल्शियम, मॅंगनीज, फोलेट सारखी पोषक तत्त्वे असतात.
मुंबई : पिस्ता हे एक ड्रायफ्रूट आहे. जे शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी तसेच आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप चांगले मानले जाते. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट्स, अमीनो अॅसिड, जीवनसत्त्वे अ, के, सी, बी -6, डी आणि ई, प्रथिने, कॅल्शियम, मॅंगनीज, फोलेट सारखी पोषक तत्त्वे असतात आणि इतर ड्रायफ्रूटपेक्षा कमी चरबी आणि कॅलरी यामध्ये असतात. (Pistachio Extremely beneficial for health)
स्मरणशक्ती वाढवते
आजकाल विसरण्याची समस्या खूप सामान्य होत आहे. सुरुवातीच्या वेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु पुढे जाऊन ही समस्या गंभीर बनू शकते. अशावेळी पिस्ताचे सेवन फायदेशीर ठरू शकते. अशी अनेक खनिजे पिस्तामध्ये आढळतात. ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि ते अधिक सतर्क आणि सक्रिय बनते. पिस्ता खाल्ल्याने मेंदूला शक्ती मिळते आणि स्मरणशक्ती सुधारते.
हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले
पिस्ता खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. रोज मूठभर पिस्ता खाल्ल्याने कोलेस्टेरॉल दूर होतो आणि हृदयाला सर्व धोक्यांपासून संरक्षण मिळते. म्हणूनच त्याची गणना हृदयाला अनुकूल पदार्थांमध्ये केली जाते.
कर्करोगाचा धोका
अनेक संशोधन असे सुचवतात की, पिस्ता खाल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. पिस्तामध्ये अँटी-कार्सिनोजेनिक घटक आढळतात, जे कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. अशा परिस्थितीत कर्करोगापासून बचाव करण्यासाठी पिस्ताचे सेवन खूप चांगले आहे.
हाडे मजबूत करते
मजबूत हाडांसाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची गरज असते. या दोन्ही गोष्टी पिस्तामध्ये आढळतात. अशा स्थितीत, त्याचे रोज सेवन हाडे मजबूत करते आणि हाडांशी संबंधित सर्व आजारांपासून आराम देते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी
डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांना निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी पिस्त्याचे दररोज सेवन केले पाहिजे कारण त्यात ए आणि ई असतात. जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात.
हे देखील लक्षात ठेवा
-पिस्ता गरम आहे, त्यामुळे हिवाळ्यात ते जास्त प्रमाणात खाल्ले जाते. उन्हाळ्यात हे मर्यादित प्रमाणात सेवन करा नाहीतर पोटात उष्णता वाढल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवू शकतात.
-जास्त पिस्ता खाल्ल्याने तुमच्या किडनीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाऊ नका.
-जास्त पिस्ता खाल्ल्याने तुमचे पोट अस्वस्थ होऊ शकते आणि अतिसार होऊ शकतो.
संबंधित बातम्या :
Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Pistachio Extremely beneficial for health)