साखर, मध आणि गुळाशिवाय तयार करा रताळ्याचा शिरा, अभिनेत्री सौम्या टंडनने सांगितली रेसिपी
अभिनेत्री सौम्या टंडनने अलीकडेच एक खुलासा केला आहे की तिने गेल्या चार वर्षापासून कुठलाही प्रकारची मिठाई खाल्लेली नाही. अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती साखरे शिवाय रताळ्याचा शिरा कसा बनवायचा त्याची रेसिपी सांगत आहे.
सेलिब्रिटींना त्यांचे फिटनेस मेंटेन करण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागते. तेव्हाच त्यांना फीट बॉडी मिळते. अभिनेता असो व अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी हे सेलिब्रिटी त्यांच्या वर्कआउट सोबतच त्यांच्या आहाराची देखील पूर्ण काळजी घेतात. सेलिब्रिटी अनेक वेळा त्यांच्या फिटनेसचे रहस्य सांगत असतात. भाभीजी घर पर है या टीव्ही सिरीयलमधील अभिनेत्री सौम्या टंडनने तिच्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे. चाळीस वर्षांची सौम्या अजूनही तरुण आणि सुंदर दिसते. अलीकडेचे अभिनेत्रीने तिच्या फिटनेस बाबत एक मोठं रहस्य उघड केलं आहे.
सौम्या हिने सांगितले आहे की तिने गेल्या चार वर्षांपासून साखरेला हात देखील लावलेला नाही. फक्त साखरच नाही तर या अभिनेत्रीने गुळ आणि मध देखील तिच्या आहारातून वगळला आहे. अभिनेत्री सौम्या टंडन ने सांगितले आहे की ती शरीरात साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ती फळे आणि ड्रायफूट्स खाते. कोणताही गोड पदार्थ बनवण्यासाठी ती फळे आणि ड्रायफ्रूटचाच वापर करते.
सौम्याने सांगितले आहे की जर तुम्हालाही गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही बिना साखरेचा शिरा बनवून खावू शकता. या अभिनेत्रीने त्याची रेसिपी ही शेअर केली आहे. जाणून घेऊया साखर, गुळ आणि मध न वापरता शिरा कसा बनवायचा.
साहित्य
१ चमचा तूप
रताळे
दूध
केशर
वेलची बदाम
कृती
हा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तूप टाका. त्यानंतर त्यात उकडून कुस्करलेले रताळे टाका. ते तपकिरी रंगाचे होईपर्यंत त्याला परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडे दूध टाका यासोबतच तुम्ही केशर, बदाम आणि वेलची पावडर देखील टाकू शकता. थोड्या वेळ शिजू द्या आणि मग गरमागरम सर्व्ह करा.
साखर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे डॉक्टर देखील सांगतात. साखरेमध्ये उच्च कॅलरी असतात त्या शरीरात चरबीच्या रूपात जमा होतात. जास्त साखर खाल्ल्याने वजन वाढू शकते. जर तुम्ही तुमच्या आहारातून साखरेसोबत गूळ आणि मधही वगळला तर तुमचे आरोग्य चांगले राहील.