तुमच्या लहान मुलांना बद्धकोष्टतेचा त्रास होतोय? त्यांची इम्यूनिटी वाढवायची असेल तर या पदार्थाचा आहारात करा समावेश

बाळ 6 महिन्यांचे झाल्यानंतर बाळाला ठोस आहार (solid foods for babies) देणे सुरू केले जाते. काही फुड्स असे आहेत जे मुलांना 8 ते 9 महिन्यांचे किंवा एका वर्षाचे झाल्यानंतर द्यायला हवेत. मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये राजगिरा सुद्धा समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. हे खूप पोषक तत्वांनी भरलेले असतात.

तुमच्या लहान मुलांना बद्धकोष्टतेचा त्रास होतोय? त्यांची इम्यूनिटी वाढवायची असेल तर या पदार्थाचा आहारात करा समावेश
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 5:15 PM

मुंबई : बाळ 6 महिन्यांचे झाल्यानंतर बाळाला ठोस आहार (solid foods for babies) देणे सुरू केले जाते. काही फुड्स असे आहेत जे मुलांना 8 ते 9 महिन्यांचे किंवा एका वर्षाचे झाल्यानंतर द्यायला हवेत. मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये राजगिरा सुद्धा समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. हे खूप पोषक तत्वांनी भरलेले असतात. (quinoa benefits and recipe for babies and toddlers)

जर तुम्ही मुलांना सुरुवतीपासूनच हेल्दी पदार्थ खायला घालाल तर पुढे जावून आपोआप त्यांनाही त्याची सवय लागते. त्यामुळे प्रत्येक आईचे हे प्रयत्न असतात की तिच्या बाळाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर खाण्यात अधिकाधिक हेल्दी फूडचा समावेश असेल. त्यादृष्टीने आई त्याची सुरुवात देखील करत असते.

राजगिरा सुध्दा हेल्दी फूड्समध्ये येतो, त्यामुळे लहान मुलांच्या आहारात याचा आवर्जून समावेश केला गेला पाहिजे. राजगिरा पोषक तत्वांनी भरपूर असल्यामुळे मुलांच्या विकासात मदत करतो.

राजगिरा एक सुपरफूड आहे, जे मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जावू शकतं. यामध्ये प्रोटिन, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिज पदार्थ असतात. राजगिरा एंटीऑक्‍सीडेंटप्रमाणे देखील काम करतो, यात फायबरचे प्रमाण देखील खूप असते. यामुळे मुलांना बद्धकोष्टतेची समस्या होत नाही.

चला तर मग आता पुढे जाणून घेऊया, मुलांना कोणत्या वयापासूनच राजगिरा खाऊ घालायला हवा, मुलांना याच्या सेवनामुळे काय फायदे होतात. याशिवाय आम्ही तुम्हाला हे सुध्दा सांगणार आहोत की याचे सेवन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

मुलांना कोणत्या वयात राजगिरा खाऊ घालावा

8 महिन्यांपेक्षा मोठ्या मुलांनाच राजगिरा खाऊ घालण्याचा सल्ला डॉक्टर देतात. बऱ्याचदा, काही पालक 8 महिन्यांच्या आधीपासूनच बालकांसाठी याचे सेवन सुरू करतात. आम्ही तुम्हाला हाच सल्ला देवू इच्छितो की, कोणतेही सुपरफूड खावू घालण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक असते.

सुरुवातीला मुलांना अगदी कमी प्रमाणात हे खाऊ घालावे आणि कालांतराने जेव्हा मुलांना याची सवय होईल त्यावेळेस तुम्ही याचे प्रमाण वाढवू शकता.

राजगिरा खाण्याचे फायदे

यामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्‍सीडेंट गुणधर्म असतात. तसेच यातील कोलेस्‍ट्रॉलचे प्रमाण अन्य प्रोटीन युक्त स्त्रोतांपेक्षा कमी असते. हे फायबरने भरपूर असते आणि अगदी सहज पचले जाते. यासाठी राजगिरा खाल्ल्याने पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांचा सामना करावा लागत नाही.

राजगिरा खाण्याने काय होते

यामध्ये उच्च प्रमाणात प्रोटीन असते जे मांसपेशींचा विकास आणि इम्‍यूनिटीच्या वाढीसाठी मदत करतात. राजगिरा मध्ये अमिनो ॲसिड सुद्धा असते, जे केसांची वाढ आणि मुलांना ताकद देण्यासाठी सुध्दा उपयुक्त ठरते.

या गोष्टींची घ्या काळजी

जर तुम्ही मुलांसाठी राजगिरा बनवत असाल तर त्याला शिजविण्याआधी चांगल्या पद्धतीने धुवून घ्या, त्यानंतर काही वेळ भिजत ठेवा. असे केल्याने त्यात असणारा कडवटपणा निघून जातो तसेच यामध्ये मीठ घालण्याची गरज नसते.

राजगिरा रेसिपी

8 महिन्यांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलासाठी याची रेसिपी बनवत असताना आधी त्याला पाण्यात चांगल्या पद्धतीने धुवून घ्या आणि साधारणपणे 2 तास भिजत ठेवा त्यानंतर एका पातेल्यात एक ते दोन ग्लास पाणी टाकून या पाण्यात ३० मिनिटापर्यंत उकळावे आणि थंड होवू द्यावे. त्यानंतर मिक्सरमध्ये घालून वाटण करून गरजेनुसार पाणी घालून त्याची पेज बनवून घ्या. आता तयार झालेली ही पेज तुम्ही मुलाला पाजू शकता.

इतर बातम्या

Bloating Remedy: जेवल्यानंतर पोटात तयार होतो गॅस, औषधांपेक्षा अधिक फायदेशीर आहेत या 7 औषधी वनस्पती

Cashews | या कारणामुळे काजूचे सेवन आरोग्यासाठी नुकसानदायक मानले जाते, जाणून घ्या त्याचे नुकसान!

Winter Superfoods : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या सुपरफूड्सचा आहारात समावेश करा

(quinoa benefits and recipe for babies and toddlers)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.