Quinoa Benefits : निरोगी जीवन जगण्यासाठी क्विनोआचा आहारात समावेश करा, वाचा!

सध्या भारतामध्ये क्विनोआची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मॉल्स, किराणा दुकाने आणि सर्व ई-कॉमर्स वेब साइट्सवर तुम्हाला क्विनोआ सहज मिळेल. क्विनोआ हे एक प्रकारचे धान्य आहे. जे दक्षिण अमेरिकेतून भारतामध्ये आले आहे. हे स्वादिष्ट असण्यासोबतच अतिशय पौष्टिक देखील आहे.

Quinoa Benefits : निरोगी जीवन जगण्यासाठी क्विनोआचा आहारात समावेश करा, वाचा!
क्विनोआ
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 12:08 PM

मुंबई : सध्या भारतामध्ये क्विनोआची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मॉल्स, किराणा दुकाने आणि सर्व ई-कॉमर्स वेब साइट्सवर तुम्हाला क्विनोआ सहज मिळेल. क्विनोआ हे एक प्रकारचे धान्य आहे. जे दक्षिण अमेरिकेतून भारतामध्ये आले आहे. हे स्वादिष्ट असण्यासोबतच अतिशय पौष्टिक देखील आहे. काही काळापासून मोठ्या शहरांमध्ये त्याची मागणी खूप वेगाने वाढली आहे.

ग्लूटेन मुक्त असण्यासोबतच क्विनोआमध्ये नऊ प्रकारची अमिनो अॅसिड आढळते. तसेच प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. रोटी, उपमा, पोहे, कोशिंबीर इत्यादी स्वरूपात याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. जाणून घ्या त्याचे फायदे.

वजन कमी करण्यास उपयुक्त

क्विनोआ जलद वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. जर क्विनोआ दररोज सकाळी रिकाम्या पोटी सॅलडच्या रूपात खाल्ल्यास बराच वेळ पोट भरलेले राहते. यामुळे दररोज सकाळी क्विनोआचा आहारात समावेश करा.

हाडे मजबूत होतात

क्विनोआमध्ये प्रथिने आणि अमीनो अॅसिड सारखे पोषक घटक असतात. ते हाडे मजबूत करण्यासाठी काम करतात. वृद्ध लोकांसाठी हे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. त्यात मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असते. हे ऑस्टियोपोरोसिस टाळण्यास मदत करतात.

पाचन तंत्रासाठी चांगले

ज्या लोकांना गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या आहेत. त्यांनी रोज क्विनोआ खावे. उच्च फायबर सामग्रीमुळे ते पाचन तंत्रासाठी खूप चांगले मानले जाते.

अशक्तपणा कमी होतो

क्विनोआमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. अशा परिस्थितीत ते शरीरातील रक्ताची कमतरता वेगाने पूर्ण करते. ज्या लोकांना अॅनिमियाची समस्या आहे. त्यांनी क्विनोआचे नियमित सेवन करावे. यामुळे अशक्तपणा कमी होतो.

कोलेस्ट्रॉल कमी करते

ज्यांना कोलेस्टेरॉल खूप जास्त आहे. त्यांच्यासाठी क्विनोआ खूप फायदेशीर मानले जाते. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचे काम करते. अशा प्रकारे ते हृदयाचे आरोग्य सुधारते.

कर्करोगाचा धोका कमी करते

सर्व संशोधन असे सूचित करतात, की क्विनोआमुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही याचे रोज सेवन केले तर तुम्ही कर्करोगासारख्या घातक आजारापासून स्वतःला वाचवू शकता.

संबंधित बातम्या : 

Hair Care | गर्भावस्थेदरम्यान केसांची काळजी कशी घ्यावी? वाचा ‘या’ खास टिप्स…

Raisins | दररोज प्या मनुक्याचे पाणी, शरीराला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे!

(Quinoa is extremely beneficial for health)

'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.