Rahul Gandhi | जाणून घ्या, ‘फीटनेस प्रिय’ राहुल गांधी यांची हेल्दी लाईफस्टाईल
राहुल गांधी हे राजकारणातील मोठे नाव आहे. त्यांच्या बाजुने आणि विरोधात असे दोन मतप्रवाह समाजात असले तरी, त्याच्या लाईफस्टाईल बाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. जाणून घ्या, राहुल गांधी यांची जिवनशैली कशी आहे, त्यांच्याकडे संपत्ती कीती आहे याबाबत सविस्तर माहिती.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नुकतीच चौकशी करण्यात आली. यावेळी,राहुल गांधी यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते उभे असल्याचे दिसले. राहुल गांधी हे राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी स्वत: या पदाचा राजीनामा दिला असला तरी ते देशातील सर्वात जुने पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिले आहेत. ते अमेठीचे खासदार होते, पण नंतर स्मृती इराणी यांच्याकडून निवडणूक हरले आणि यूपीच्या राजकारणातून बाहेर पडले. यानंतर प्रियांका गांधी यांना यूपीच्या राजकारणाचा उगवता चेहरा बनवण्यात आले. तर राहुल गांधी हे काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणाचा चेहरा (The face of national politics) आहेत. पण तुम्हाला राहुल गांधींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी (About personal life) माहिती आहे का, राहुल गांधींचे घर, छंद, वाहने, नेटवर्क या सर्व गोष्टींची माहिती जाणून घ्या.
राहुल गांधी यांचे बालपण आणि शिक्षण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 रोजी नवी दिल्ली येथे झाला. त्यांचे वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी. राहुल गांधी हे इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे नातू आहेत. त्यांनी 1989 मध्ये दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षांनंतर राहुल गांधींनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आणि परदेशात पुढील शिक्षण घेतले. वडिलांच्या मृत्यूनंतर, राहुलचे संरक्षणात्मक कारणांसाठी फ्लोरिडातील रोलिन्स कॉलेजमध्ये स्थलांतर केले. येथे राहुलने नाव आणि ओळख लपवून शिक्षण घेतले. याची माहिती फक्त कॉलेज प्रशासन आणि सुरक्षा एजन्सीला होती. येथे त्याने राऊल विंची या नावाने शिक्षण घेतले. नंतर 1995 मध्ये राहुल गांधींनी ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमधून एम फिल पदवी मिळवली.
राहुल गांधी यांचा फिटनेस
राहुल गांधींनी जपानी मार्शल आर्ट ‘आयकिडो’ चे प्रशिक्षण घेतले आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल. आयकिडो अशा मार्शल आर्टमध्ये एखाद्या व्यक्तीला कोणत्याही शस्त्राशिवाय प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याची कला शिकवली जाते. वयाची पन्नाशी ओलांडलेले राहुल गांधी एकदम फिट दिसत आहेत. तो रोज सकाळी सायकल चालवतात. याशिवाय त्यांना स्विमिंग आणि स्कूबा डायव्हिंगचीही आवड आहे. राहुल रोज थोडा वेळ जिममध्ये घालवतात आणि व्यायाम करतात. गेल्या वर्षी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील शाळेत राहुलने स्टेजवर सर्वांसमोर पुश-अप केले आणि विद्यार्थ्यांना फिटनेसचे मंत्र दिले.
राहुल गांधींचे रुटीन लाईफ
खासदार राहुल गांधी यांची दिनचर्या साधी आहे. ते सकस आहार घेतात. सकाळच्या नाश्त्यात इडली-डोसा, सांबार याशिवाय ड्रायफ्रुट्स खायला त्यांना आवडतात. फिट राहण्यासाठी लिंबूपाणी आणि शीतपेये घेतात. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात त्यांना मसूर, भात, रोटी, भाज्या आणि दक्षिण भारतीय पदार्थ खायला आवडतात. शाकाहारी खाण्यासोबतच राहुल नॉनव्हेजही आवडीने खातात.
राहुल गांधींची एकूण संपत्ती
गांधी घराण्याशी संबंधित असल्यामुळे राहुल गांधी यांची गणना श्रीमंत राजकारण्यांमध्ये केली जाते, जरी शपथपत्रात दाखल केलेल्या पत्रानुसार, राहुल गांधींची एकूण संपत्ती सुमारे 16 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी महिन्याला 10 लाख रुपये आणि वार्षिक 1 कोटी रुपये कमावतात.