मुंबई : चेहरा (Face) टवटवीत दिसावा यासाठी आपण अनेक उपाय करतो. पण तुम्हाला माहितीये का आपल्या घरातील काही गोष्टींमुळे आपलं सौंदर्य खुलू शकतं. त्यातलंच एक फळ म्हणजे लाल द्राक्ष (Red Grapes). लाल द्राक्ष खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण त्याचा सर्वाधिक फायदा चेहऱ्यासाठी होतो. याचा आहारात समावेश करूनही त्वचा चमकदार बनवता येते. त्वचा तजेलदार आणि टवटवीत बनवण्यासाठी द्राक्षे खूप फायदेशीर आहेत. उन्हाळ्यात तर तुम्ही तुमच्या आहारात लाल द्राक्षांचाही समावेश करायलाच पाहिजे. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग पूर्णपणे नाहीसे होतील. लाल द्राक्ष अनेक प्रकारे वापरता येतील. कधी त्याचा ज्यूस बनवून तर कधी त्याचा शेक बनवूनही तुम्ही पिऊ शकता… तुम्ही फेसपॅक (Facepack) बनवूनही चेहऱ्याला लावू शकता…
लाल द्राक्षाचे फायदे
तणाव त्वचेच्या रोगांचे कारण बनू शकते. हा तणाव नियंत्रित ठेवण्यासाठी लाल द्राक्ष फायदेशीर आहेत. तणावाचा तुमच्या चेहऱ्यावरही परिमाम होतो. तणाव कमी करण्यासाठी लाल द्राक्षे उपयुक्त ठरतात. लाल द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. व्हिटॅमिन सी त्वचेला सुंदर बनवते. हे कोलेजन दुरुस्त करण्यासाठीदेखील उपयुक्त आहे. यामुळे त्वचेवरील डाग आणि मुरुम दूर करण्यासाठीदेखील मदत होते. लाल द्राक्षांमध्ये रेसवेराट्रोल असते. जे वृद्धत्वाची लक्षणे कमी करते. लाल द्राक्षांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीव्हायरल गुणधर्म देखील असतात, हे गुणधर्म त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण करतात.लाल द्राक्षांमध्ये पॉलिफेनॉल असतात, जे त्वचेला सूर्यप्रकाशापासून वाचवतात आणि लाल द्राक्षे अल्ट्राव्हायोलेट यूव्ही किरणांचा प्रभाव कमी करतात.
तुम्ही द्राक्षांचा अनेक प्रकारे उपयोग करू शकता. त्यांना फळ रूपात खावू शकता. शिवाय त्याचा ज्यूस बनवू शकता. शिवाय त्याचा फेसपॅक बनवून चेहऱ्याला लावल्यास चेहरा फ्रेश राहण्यास मदत होईल. फेसपॅकसाठी टोमॅटो आणि द्राक्ष एकत्र बारीक करून घ्या. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 20 मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. तुम्हाला फरक जाणवेल.
टीप- टीव्ही 9 मराठी केवळ आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. या टिप्स फॉलो करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
संबंधित बातम्या