Pizza : घरचे-घरी बनवा हा हेल्दी सूजी पिझ्झा, जाणून घ्या त्याची खास रेसिपी! 

मैद्याचा पिझ्झा खायचा नसेल तर सूजी पिझ्झा ही एक स्वादिष्ट डिश आहे. सूजी पिझ्झा ब्रेडच्या मदतीने घरी सहज बनवता येतो. ही हेल्दी रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त ब्राऊन ब्रेड, सूजी, दही, मलई, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, ब्लॅक ऑलिव्ह, मीठ आणि मिरी पावडरची आवश्यक्ता आहे.

Pizza : घरचे-घरी बनवा हा हेल्दी सूजी पिझ्झा, जाणून घ्या त्याची खास रेसिपी! 
पिझ्झा
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 7:22 AM

मुंबई : मैद्याचा पिझ्झा खायचा नसेल तर सूजी पिझ्झा ही एक स्वादिष्ट डिश आहे. सूजी पिझ्झा ब्रेडच्या मदतीने घरी सहज बनवता येतो. ही हेल्दी रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त ब्राऊन ब्रेड, सूजी, दही, मलई, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, ब्लॅक ऑलिव्ह, मीठ आणि मिरी पावडरची आवश्यक्ता आहे.

पिझ्झाला स्वादिष्ट चव देण्यासाठी तुम्ही वर थोडे चीज घालू शकता. ही पिझ्झा रेसिपी बनवायला इतकी सोपी आहे की तुम्ही फक्त 20 मिनिटात बनवू शकता. तुम्हाला हा पिझ्झा बेक करण्याचीही गरज नाही. कारण तुम्ही नॉन-स्टिक तव्यावर सहज बेक करू शकता. जर तुम्ही सध्या डाएट फॉलो करत असाल तर हा सूजी पिझ्झा फायदेशीर आहे.

सूजी पिझ्झाचे साहित्य

4 स्लाईस ब्राऊन ब्रेड

1/2 कांदा

1/2 शिमला मिरची (हिरवी मिरची)

आवश्यकतेनुसार मीठ

4 चमचे दही

आवश्यकतेनुसार चीज

1 कप सूजी

1/2 टोमॅटो

10 ऑलिव्ह

1/2 टीस्पून काळी मिरी

2 चमचे फ्रेश क्रीम

1 चमचे तेल

सूजी पिझ्झा कसा बनवायचा?

स्टेप 1-

एका भांड्यात सूजी, दही, फ्रेश क्रीम घ्या. जाड पीठ तयार करण्यासाठी मीठ, मिरपूड घालून चांगले मिसळा. आता त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घालून मिक्स करा. मिश्रण थोडे घट्टच ठेवा.

स्टेप 2-

ब्राऊन ब्रेडचे तुकडे एका प्लेटमध्ये ठेवा आणि मिश्रण प्रत्येकावर सारखे लावा. आता प्रत्येक स्लाइसवर 1-2 चमचे किसलेले चीज घाला. त्यावर ऑलिव्हचे काही तुकडे ठेवा आणि हाताने हलके दाबा.

स्टेप 3-

आता एका नॉन-स्टिक तव्यावर तेलाचे काही थेंब टाका. तव्यावर ब्रेडचे तुकडे ठेवा. हे स्लाइस तपकिरी होईपर्यंत शिजू द्या. आता ते दुसऱ्या बाजूला भाजून घ्या आणि आणखी दोन मिनिटे शिजू द्या.

स्टेप 4-

सर्व स्लाइस शिजल्यानंतर टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करा आणि त्याचा आनंद घ्या.

संबंधित बातम्या : 

Hair Care | गर्भावस्थेदरम्यान केसांची काळजी कशी घ्यावी? वाचा ‘या’ खास टिप्स…

Raisins | दररोज प्या मनुक्याचे पाणी, शरीराला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे!

(semolina pizza beneficial for health)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.