आजकाल धकाधकीच्या जीवनशैलीत पुर्वीप्रमाणे नातेवाईक, मित्रमंडळींना भेटणं होत नाही. मात्र पार्टी अथवा एखादा समारंभ प्रियजनांना भेटण्यासाठी एक उत्तम माध्यम असतं. मग अशा वेळी प्रश्न पडतो पार्टीमध्ये स्नॅक्स काय बनवणार. यासाठी आम्ही करणार तुम्हाला मदत. आम्ही तुमच्यासाठी तसेच पाहुण्यांसाठी आणले आहेत सोपी स्नॅक्सची यादी
1 पनीर बॉल्स (Paneer balls)
पनीर आणि चिझ हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. पनीर बॉल्स बनविण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि साहित्य पण जास्त लागत नाही. त्यामुळे पार्टीसाठी उत्तम स्नॅक्स आहे.
2. क्विनोआ पफ्स वैरायटी कॉम्बो
हे क्विनोआ पफ्स क्विनोआ, राजगिरा, नाचणी, सोया, तांदूळ आणि मका यांसारख्या सुपर ग्रेन्सने भरलेले आहेत . हे स्नॅक्स हेल्दी, आर्टिफिशियल टेस्ट फ्री आणि रूचकर आहेत, त्यामध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमीनो ऍसिडसह फायबर आणि प्रथिने देखील जास्त असतात. त्याची कुरकुरीत आणि चवदार चव तुमचं मन तृप्त करते.
3. मिनी समोसा
हा चहा टाईमचा बेस्ट पाटर्नर आहे. मिनी समोसाची तिखट,गोड आणि आंबट चव सगळ्यांना आवडते.
4. रागी, ज्वारी आणि मोरिंगा क्रिस्पी
सर्व नैसर्गिक, कॅल्शियम, लोह, फायबर, प्रथिने इत्यादी समृद्ध पोषक तत्वांनी भरलेले आहे. हे स्नॅक्स तळलेल्या चिप्सपेक्षा 50% कमी चरबी असते आणि 100% निरोगी आणि पौष्टिक असतात.
5. मटरपासून बनवा अनेक गोष्टी
हिरवा स्नॅक्स दिसायला अगदी आकर्षित असतो. हा स्नॅक्स पार्टीची रंगत वाढवण्यासाठी मदत करणार. वसाबीची चव गरम मोहरीसारखीच असते आणि सामान्यतः मसाला म्हणून वापरली जाते.
6. पार्टी मिक्स
नट्स आणि सीड्सचं एक्साइटिंग कॉम्बिनेशन असलेले पार्टी स्नॅक्स आहे. ड्रिंक, चहा आणि ज्यूस सोबत हा स्नॅक्स बेस्ट आहे.
संबंधित बातम्या :
Skin Care Tips : चेहऱ्याची नैसर्गिक चमक कायम ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा!
Hair Care : प्रसूतीनंतर केस गळतीची समस्या आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!