वाढलेले वजन कमी करण्यासाठी चहा आणि ग्रीन टीमध्ये हे मिक्स करून प्या !
वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वजण प्रयत्न करत आहे. मात्र, अनेक डाएट आणि व्यायाम करूनही वजन काही कमी होताना दिसत नाही.
मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वजण प्रयत्न करत आहे. मात्र, अनेक डाएट आणि व्यायाम करूनही वजन काही कमी होताना दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला एक खास टिप्स सांगणार आहोत. जे तुम्ही फाॅलो केल्यानंतर तुमचे वजन झटपट कमी होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. (Take this remedy to lose weight)
आपल्यापैकी बरेच लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी घेतात. ग्रीन टीमध्ये असलेल्या घटकांमुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. चहा आणि ग्रीन टीमध्ये आपण शेपूचे काही पाने मिक्स करून पिले पाहिजेत. ज्यामुळे आपले वजन झटपट कमी होण्यास मदत मिळते. शेपूमध्ये व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज असते. विशेष म्हणजे हा शेपूचा चहा घेतल्याने आपले वजन झटपट कमी होते. हे चरबी बर्न करण्यास मदत करते.
ग्रीन टी मधील घटक शरीरातील मेटाबॉलिज्म घटकाला वाढवतात. त्यामुळे शरीरातील वजन कमी होते. पण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सोबतच नियमित व्यायामही गरजेचा असतो. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायामासोबतच, फळ, पालेभाज्या यांचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच यासोबतच ग्रीन टी चे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
ग्रीन टीचे पॅकेट कपात घेऊन त्यावर गरम पाणी टाका आणि 1 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर प्या. दिवसातून 1 ते 3 कपापेक्षा जास्त ग्रीन टी सेवन करू नये. असे केल्याने शरीराला इजा होऊ शकते आणि ती व्यक्ती शारीरिक दुर्बलतेचा बळी पडू शकते. तसेच ग्रीन टीचे सेवन करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर किमान एक तासाच्या अंतरानेच काहीही पदार्थ खावेत.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Take this remedy to lose weight)