Health Care : हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्हाला किती लिटर पाण्याची आवश्यकता असते? जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे!
शरीराला हायड्रेट (Hydrated) ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. उन्हाळ्याच्या हंगामात जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सध्या तापमान (Temperature) चांगेलच वाढले आहे. यामुळे घराच्या बाहेर पडताना देखील काळजी घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडल्यावर सुध्दा कलिंगड, अननस, संत्री, मोसंबी, ऊसाचा रस, ताक आणि आंब्याच्या रसांचे सेवन करा.
मुंबई : शरीराला हायड्रेट (Hydrated) ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. उन्हाळ्याच्या हंगामात जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सध्या तापमान (Temperature) चांगेलच वाढले आहे. यामुळे घराच्या बाहेर पडताना देखील काळजी घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडल्यावर सुध्दा कलिंगड, अननस, संत्री, मोसंबी, ऊसाचा रस, ताक आणि आंब्याच्या रसांचे सेवन करा. यामुळे उन्हात बाहेर फिरले तरीही आपल्या शरीरामधील ऊर्जा (Energy) कायम राहण्यास मदत होते. या हंगामात किमान आठ ते नऊ ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तसेच आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर लक्ष द्या.
संशोधन काय म्हणते जाणून घ्या
नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस इंजिनीअरिंग अँड मेडिसिननुसार निरोगी प्रौढ व्यक्तीने हवामानानुसार 3.6 लिटर आणि 2.8 लिटर (स्त्री) पाणी प्यावे. यामध्ये इतर पेये आणि खाद्यपदार्थांमधील द्रव समाविष्ट आहेत. आपण दररोज वापरत असलेल्या द्रवपदार्थांपैकी सुमारे 20 टक्के पाणी अन्न आणि इतर पेयांमधून येते.
याप्रमाणे पाणी पिण्याचा प्रयत्न करा
दिवसातून आठ ग्लास पाणी पिणे आणि त्याचे नियमितपणे पालन करणे सोपे वाटते. परंतु ते प्रत्येकासाठी योग्य नाही. समजा उन्हाळ्यात एखादी व्यक्ती दिवसभर एसी रूममध्ये बसून कोणतीही शारीरिक हालचाल करत नसेल, तर त्याला दिवसभरात 8 ग्लासांपेक्षा कमी पाण्याची गरज भासू शकते. जर कोणी दिवसभर उन्हात फिरत असेल तर तो व्यक्ती जास्त पाणी पितो.
वर्कआउट झाल्यावर या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही वर्कआउट करत असाल तर वर्कआउट दरम्यान आणि नंतर शरीराला पाण्याची गरज असते. यावेळी तुम्ही हेल्थ ड्रिंक देखील घेऊ शकता. यामुळे शरीराची खनिजांची गरज भागेल. त्याचप्रमाणे आपल्या शरीराची पाण्याची गरज हवामानावर अवलंबून असते. आता उन्हाळा असल्याने तापमान सतत वाढत आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या. आता डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. म्हणूनच सतत पाणी प्या.
संंबंधित बातम्या : Weight Loss : स्लिम व्हायचे आहे? मग, या 5 मसाल्यांचा आहारात समावेश नक्की करा!
Health Care : जमिनीवर झोपणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, या आरोग्य समस्या होतील दूर!