Health Benefits of Sesame : दररोजच्या आहारात तिळाचा समावेश करा ‘हे’ फायदे होतील !

तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच तिळामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्सचा स्रोत आहेत.

Health Benefits of Sesame : दररोजच्या आहारात तिळाचा समावेश करा 'हे' फायदे होतील !
तीळ
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 3:31 PM

मुंबई : तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच तिळामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्सचा स्रोत आहेत. तसेच तिळातील पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक असतात. तिळात सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यात नाहीत. त्यामुळे फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन, रक्त यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी करतात. (There are many benefits to including sesame seeds in the diet)

हाडांसाठी फायदेशीर – तिळामध्ये विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्ये पोषक घटक असतात. हे खनिजे नवीन हाडे तयार करण्यात आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. तीळ भाजून किंवा कच्चे देखील खाल्ले जातात. तिळात अँटीऑक्सिडेंट नावाचे घटक असतो. जो बर्‍याच रोगांच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.

उच्च कोलेस्ट्रॉल – एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, नियमितपणे तीळ खाल्यास खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड कमी करण्यास मदत होते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

उच्च रक्तदाब – तिळामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. हे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. संशोधनात असे दिसून आले आहे की, तिळात लिग्निन, व्हिटॅमिन ई आणि इतर अँटीऑक्सिडेंट्ससारखे अनेक घटक आढळतात. ज्यामुळे निरोगी रक्तदाब नियंत्रणात राहतो.

आजारांपासून सुटका – तिळात सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास अवरोध होतो. त्यामुळे फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन, रक्त (ल्युकेमिया) यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी करतात. याशिवायही तीळ बहुगुणी आहे.

मधुमेह – तिळात प्रथिने, निरोगी चरबी आणि फायबर असते. हे सर्व रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. यात पिनोरेसिनॉल आहे. हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. म्हणूनच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही तिळाचा समावेश आहारात करा

तणावापासून मुक्ती मिळवा – आजकाल धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात. तिळाच्या सेवनाने तुमच्या मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते. लिपोफोलिक अँटीऑक्सिडंटमुळे वयवाढीचा मेंदूवर परिणाम होत नाही.

हृदयाचे स्नायू तंदुरुस्त राखा – तिळात आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम यासारखे घटक असतात. त्यामुळे हृदयाचे स्नायू सक्रिय राहण्यास मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर – तिळामध्ये अँटीऑक्सिडेंट, प्रतिजैविक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. तसेच तिळाचे तेल त्वचेच्या पेशींचे प्रदूषण आणि अतिनील किरणांपासून होणारे नुकसानपासून संरक्षण करते. जखमेच्या उपचार, वृद्धत्व यासाठी देखील तिळाचे तेल वापरले जाऊ शकते. केसांसाठी देखील तिळाचे तेल फायदेशीर आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(There are many benefits to including sesame seeds in the diet)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.