Health Care : जेवण केल्यानंतर पोट दुखते? मग हे घरगुती उपाय उपयोगी नक्कीच पडतील!

होळीचा  (Holi) सण रंगांबरोबरच विविध खाद्यपदार्थांसाठी ओळखला जातो. दही वडे, नमकीन, समोसे असे सर्व तळलेले पदार्थ (Oily Food) होळीच्या दिवशी तयार केले जातात. सणाच्या आनंदामध्ये हे सर्व पदार्थ आपण चार घास जास्तच खातो. मात्र, त्यानंतर पोट बिघडण्याच्या समस्यांमध्ये (Problem) मोठी वाढ होते.

Health Care : जेवण केल्यानंतर पोट दुखते? मग हे घरगुती उपाय उपयोगी नक्कीच पडतील!
पोटदुखीची समस्या दूर करण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 1:16 PM

मुंबई : होळीचा (Holi) सण रंगांबरोबरच विविध खाद्यपदार्थांसाठी ओळखला जातो. दही वडे, नमकीन, समोसे असे सर्व तळलेले पदार्थ (Oily Food) होळीच्या दिवशी तयार केले जातात. सणाच्या आनंदामध्ये हे सर्व पदार्थ आपण चार घास जास्तच खातो. मात्र, त्यानंतर पोट बिघडण्याच्या समस्यांमध्ये (Problem) मोठी वाढ होते. तुमच्यासोबतही असे काही होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. येथे जाणून घ्या खास टिप्स ज्यामुळे बिघडलेले पोट काही तासांमध्ये परत चांगले होईल.

  1. दही आणि खिचडी जेव्हा पोटात त्रास होतो. तेव्हा आपण समजून घेतले पाहिजे की पोटाला विश्रांतीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत हलके आणि पचणारे अन्न खा. अशा परिस्थितीत मूगडाळ खिचडी आणि दही खाऊ शकता. यामुळे पोटाला आराम मिळेल. अपचन किंवा गॅस सारख्या समस्यांमध्ये आराम मिळेल. मूगडाळ खिचडी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
  2. पाणी जास्त प्या तळलेले खाल्ल्यानंतर शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते आणि लोक अनेकदा कमी पाणी पिऊन त्यांची समस्या वाढवतात. पाणी तुमचे शरीर डिटॉक्स करते. अशा परिस्थितीत पाण्याची कमतरता भासू देऊ नका. शक्य असल्यास कोमट पाण्यात थोडे लिंबू घालून प्या. यामुळे अजून आराम मिळेल.
  3. भाजलेले जिरे पोट बिघडल्यास भाजलेले जिरेही खूप उपयुक्त ठरू शकतात. भाजलेले जिरे कोमट पाण्यासोबत घेतल्याने खूप आराम मिळतो. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जिरे पाणी उकळल्यानंतर ते पिऊ शकता. हे देखील खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे अपचनाची समस्या दूर होण्यास मदत होते.
  4. केळी जर तुम्हाला लूज मोशनची समस्या असेल तर तुम्ही केळी खावी. केळीमध्ये पेक्टिन नावाचा घटक आढळतो. हे लूज मोशनच्या समस्येवर नियंत्रण ठेवते. याशिवाय जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर त्याच्या ताज्या पानांचा अर्क घ्या.
  5. आले चहा आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पोटातील गॅस आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी हे गुणकारी मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही आल्याचा चहा प्यायला तर तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. पण या चहामध्ये दूध वापरण्याची गरज नाही. पाण्यात आले उकळल्यानंतर त्यात थोडे लिंबू आणि मध मिसळून हा चहा प्या.

(या लेखात दिलेली माहिती सामान्य माहीतीवर आधारित आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच उपाय फाॅलो करा.)

संबंधित बातम्या : 

Health Care Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी उन्हाळ्यात ‘या’ खास फळांचा आहारात समावेश करा!

होळीमध्ये गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.