Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी ओट्सची खास रेसिपी, वाचा!

वजन कमी करण्यासाठी आपण आहारामध्ये (Food) विविध गोष्टींचा समावेश करतो. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल किंवा त्यासंबंधी प्रयत्न करत असाल तर या काळात तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ओट्स (Oats) वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

Weight Loss : जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी ओट्सची खास रेसिपी, वाचा!
वजन कमी करण्यासाठी ओट्स फायदेशीर आहेत. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 9:32 AM

मुंबई : वजन कमी करण्यासाठी आपण आहारामध्ये (Food) विविध गोष्टींचा समावेश करतो. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल किंवा त्यासंबंधी प्रयत्न करत असाल तर या काळात तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ओट्स (Oats) वजन कमी करण्यासाठी मदत करतात. नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यामध्ये आपण ओट्सचा समावेश करून वजन कमी करू शकतो. ओट्समध्ये भरपूर पोषकतत्व असतात. ओट्सपासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते. ओट्समध्ये भरपूर गिनीज, प्रोटीन, फॉस्फरस आणि लोह असते. ओट्समध्ये भरपूर फायबर (Fiber) असल्याने ते पोटासाठीही खूप चांगले मानले जाते. आज आम्ही तुम्हाला ओट्सची एक खास रेसिपी सांगणार आहोत, ज्याचा तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये समावेश करू शकता.

साहित्य

एक कांदा चिरलेला, एक टोमॅटो चिरलेले, बीन्स, कांद्याची पात चिरलेला, एक बटाटा, शिमला मिरची चिरलेली, लाल मिरची, काळी मिरी, हळद, मोहरी, जिरे, कढीपत्ता, मीठ, मसाले, तेल आणि ओट्स हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे.

करण्याची पध्दत

एक पॅन घ्या आणि त्यात तेल गरम करा. गरम तेलात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाका. तळल्यावर त्यात कांदे आणि टोमॅटो घाला. आता भाज्या घाला आणि हळद-मीठ घालून थोडा वेळ शिजवा. थोड्या वेळाने सर्व मसाले घालून भाज्या शिजू द्याव्यात. यानंतर त्यात ओट्स घालून थोडे परतून घ्या. 7 ते 8 मिनिटे शिजवल्यानंतर तुमची व्हेजिटेबल ओट्स तयार आहेत. या खास ओट्समुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय सर्व भाज्यांचे पोषणतत्व आपल्या शरीराला मिळतात.

ओट्सचे फायदे वाचा

आपल्याला कमी कॅलरी आणि पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असा नाश्ता खायचा असेल तर ओट्स खाणे फायदेशीर ठरते. हे शरीरातील हानिकारक घटक काढते. यामध्ये ग्लूकोन नावाचा घटक असतो जो आतडे साफ करण्यास मदत करतो. आपण ते वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता. एका संशोधनात असे आढळले आहे की, नाश्त्यामध्ये 1.5-6 ग्रॅम ओट्स खाल्ल्याने दिवसभर आपल्याला उत्साह येतो. यामुळे ओट्सचा आहारामध्ये समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते.

संबंधित बातम्या :

Skin Care : ग्लोइंग स्किनसाठी कोरफडचा अशाप्रकारे वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

Health Care Tips : बेलाच्या फळाचा ज्यूस आरोग्यासाठी वरदानच, जाणून घ्या 5 मोठे फायदे!

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.