Health Care : हळदीचा चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या हळदीचे औषधी गुणधर्म!
हळद हा एक मसाला आहे. जो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या मसाल्याचा वापर कमी-अधिक प्रमाणात सर्वच खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. औषधी, अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे हळद हजारो वर्षांपासून वापरली जात आहे.
मुंबई : हळद हा एक मसाला आहे. जो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या मसाल्याचा वापर कमी-अधिक प्रमाणात सर्वच खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. औषधी, अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे हळद हजारो वर्षांपासून वापरली जात आहे. त्याच प्रकारे हळदीच्या चहाचे देखील मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. चला जाणून घेऊयात हळदीच्या चहाचे फायदे.
1. हळदीच्या चहाचे दाहक-विरोधी गुणधर्म संधिवात असलेल्या लोकांमध्ये जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात. हे वेदनादायक लक्षणे कमी करते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की हळद, कर्क्यूमिन नावाचे सक्रिय संयुग, ऑस्टियोआर्थरायटिस असलेल्या रुग्णांमध्ये वेदना कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
2. अल्झायमर नेमका कशामुळे होतो हे शोधण्यासाठी अजूनही संशोधन सुरू आहे. मात्र, अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, हळदीतील कर्क्यूमिन नावाचे अँटीऑक्सिडंट अल्झायमरच्या प्रभाव कमी करते.
3. अल्सरेटिव्ह कोलायटिस हा एक जुनाट आजार आहे. ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या खालच्या बाजूस अल्सर होतात. हळद या आजाराच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करते. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरच्या मते, एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, ज्या अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या रुग्णांनी हळद खाल्ली त्यांना पुन्हा हा आजार होण्याची शक्यता कमी आहे.
4. हळदीचे औषधी गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास सक्षम आहेत. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, हळद शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यामुळे सध्याच्या काळामध्ये दररोज हळदीचा चहा घेणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
हळदीचा चहा तयार करण्याची पध्दत-
एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये हळद अर्धा चमचा मिक्स करा आणि साधारण दहा मिनिटे ते उकळूद्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा. हा चहा दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!