Weight loss | पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, अशा प्रकारे करा ‘मेथी’चा वापर

दलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या वजनावर झालेला आहे. यात कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत.

Weight loss | पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, अशा प्रकारे करा 'मेथी'चा वापर
मेथीचे दाणे
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 3:05 PM

मुंबई : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या वजनावर झालेला आहे. यात कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. वाढलेले वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. त्यांच्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे चुकीचा आहार टाळणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. (Use Methi aka Fenugreek for lose belly fat)

जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात तर आजच आपल्या आहारामध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश करा. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. मेथीच्या दाण्यांमध्ये पुष्कळ पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे आपली चरबी कमी होते.

-दररोज 10 ग्रॅम मेथीचे सेवन केले, तर शरीरावरची चरबी कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते. ते आतड्यांमधून ग्लूकोज शोषून घेण्यास आणि मधुमेह नियंत्रित करण्याचे कार्य करतात. याव्यतिरिक्त, मेथीमधील अल्कॉइड्समुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण सुधारते आणि ग्लाइसेमिक पातळी कमी होते. यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारामध्ये मेथी घेणे गरजेचे आहे.

-वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाण्यात मेथीची दाणे भिजत घालावे आणि त्यांना 10 ते 15 मिनिटे उकळवावे. यानंतर, चहाप्रमाणेच त्याचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील आणि शरीरामधील अतिरिक्त चरबी गायब होते.

-मेथीमध्ये आढळणारे पौष्टिक घटक मधुमेहाच्या समस्येसवर गुणकारी ठरतातच, परंतु पचन आणि आम्लपित्ताच्या समस्येस देखील प्रतिबंधित करतात. जर, आपल्यालाही मेथीच्या माध्यमातून या समस्यांपासून आराम मिळवायचा असेल, तर यासाठी दररोज 10 ग्रॅम मेथीचे दाणे गरम पाण्यात भिजवून त्याचे सेवन करावे

-मेथीचे दाणे लोह आणि प्रथिने यांचे समृद्ध स्रोत आहेत. हे दोन पोषक तत्व केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. त्यामध्ये प्लाव संयुगाची एक अद्वितीय रचना आहे, ज्यात फ्लेवोनोइड्स आणि सैपोनिन्सचा समावेश आहे. या संयुगाला त्यांच्या अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल प्रभावांमुळे केसांच्या वाढीस प्रभावशाली असल्याचे मानले जाते.

एकावेळी किती मेथी खावी? अभ्यासानुसार, एका दिवसात 2 ते 25 ग्रॅम मेथीचे सेवन करणे योग्य आणि सुरक्षित आहे. तथापि, त्याचे प्रमाण किती बरोबर आहे, ते सेवन करत असलेल्या व्यक्तीवर अवलंबून असते. तसे, त्याचे एकावेळी जास्तीत जास्त प्रमाण 10 ग्रॅम निश्चित केली गेले आहे. याशिवाय मेथीचे कच्चे दाणे 25 ग्रॅम, पावडर 25 ग्रॅम आणि भिजवलेली मेथी देखील 25 ग्रॅमच योग्य आहे. परंतु, जर तुम्हाला मेथीचे सेवन करायचे असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मेथीचे सेवन केल्यास चयापचय क्रिया, इन्सुलिन आणि ग्लुकोज सुधारण्यास मदत होते. या व्यतिरिक्त, ज्यांना मधुमेह होण्याचा धोका आहे किंवा ज्यांचा कौटुंबिक इतिहास या रोगाशी जोडलेला आहे, त्यांच्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Use Methi aka Fenugreek for lose belly fat)

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....