Health Care : रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दलचे फायदे!

सकाळपासून सुरू होणारी धावपळ दिवसभर सुरू असते. यामुळे आपण सकाळचा नाश्ता (Breakfast) आणि दुपारचे जेवण व्यवस्थित करू शकत नाहीत. मग काय...संध्याकाळी दिवसभराचा कडता एकदाच काढला जातो आणि भरपेट दाबून जेवण केले जाते. मग जेवण झाले की, लगेचच झोपण्याची (Sleep) तयारी सुरू होते आणि दिवसभराच्या थकव्यामुळे झोपही लगेचच लागते.

Health Care : रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दलचे फायदे!
रात्रीचे जेवण झाल्यानंतर चालणे शरीरासाठी फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 9:28 AM

मुंबई : सकाळपासून सुरू होणारी धावपळ दिवसभर सुरू असते. यामुळे आपण सकाळचा नाश्ता (Breakfast) आणि दुपारचे जेवण व्यवस्थित करू शकत नाहीत. मग काय…संध्याकाळी दिवसभराचा कडता एकदाच काढला जातो आणि भरपेट दाबून जेवण केले जाते. मग जेवण झाले की, लगेचच झोपण्याची (Sleep) तयारी सुरू होते आणि दिवसभराच्या थकव्यामुळे झोपही लगेचच लागते. तुम्हीही रोज असेच करत असाल तर काळजी घ्या. तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. तज्ज्ञांच्या मते जेवण झाल्यावर किमान 20 मिनिटे चालणे (Walking) अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते, तसेच अनेक आजारांपासून बचाव होतो.

रात्रीचे जेवण झाल्यानंतर फिरण्याचे फायदे कोणते हे जाणून घेऊयात

चयापचय वाढण्यास मदत

रात्रीच्या जेवणानंतर सुमारे अर्धा तास चालल्याने तुमच्या कॅलरी बर्न होतात. तुमची चयापचय क्रिया वाढते. तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या येत नाहीत आणि तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचन, गॅस इत्यादींचा त्रास होत नाही. याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे वजन कमी होण्यासही मदत होते.

साखरेची पातळी नियंत्रित राहते

ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी चालणे फार महत्वाचे असल्याचे सांगितले जाते. चालण्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते. Iperglycemia चा धोका देखील कमी होतो. जर तुम्हाला मधुमेह नसेल तर जेवल्यानंतर दररोज चालणे तुम्हाला मधुमेहाच्या जोखमीपासून दूर ठेवते.

चांगली झोप येण्यास मदत

रोज रात्री चालण्याने तुम्हाला चांगली झोप येते. रक्ताभिसरण चांगले होते, त्यामुळे तुमचे मन शांत होते आणि तुम्हाला चांगली झोप लागते. चांगली झोपही आरोग्य सुधारते. बऱ्याच लोकांना रात्री झोप न येण्याची समस्या असते. मग अशावेळी आपण जेवण झाल्यावर थोडा वेळ चालले पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत

आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज चालण्याने आपले अंतर्गत अवयव चांगले कार्य करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सध्याच्या वातावरणामध्ये चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे.

तणाव कमी होण्यास मदत होते

दिवसभर काम केल्यावर शरीर थकतेच. शिवाय मनातील सर्व ताणतणावही दूर होतात. रोज चालण्याने हा ताण कमी होतो आणि मन शांत होते. आजकाल तणाव हे सर्व समस्यांचे कारण मानले जाते. तणाव कमी होऊन या समस्यांवरही नियंत्रण मिळते. यामुळे रात्री चालणे आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Health : उन्हाळ्यात मधुमेहाच्या रूग्णांनी अशाप्रकारे काळजी घेणे आवश्यक, या टिप्स फाॅलो करा! 

अँकिलोझिंग स्पॉन्डीलायटिसची प्रक्रिया धीमी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना, वाचा याबद्दल सविस्तर!

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.