Weight lose Tips | वजन कमी करायचे आहे का? तर या गोष्टी टाळा…

मुंबई : लठ्ठपणा नको आणि निरोगी जीवन जगू इच्छित असाल तर तुम्ही काय खात आहात हे सर्वात महत्वाचे आहे. कारण एकदा आपले वजन वाढल्यानंतर, पुन्हा ते कमी करताना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अगोदरच वजन वाढू नये, आणि वाढलेले वजन कसे नियंत्रणात ठेवायचे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.(Want to lose weight? So avoid these […]

Weight lose Tips | वजन कमी करायचे आहे का? तर या गोष्टी टाळा...
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 1:02 PM

मुंबई : लठ्ठपणा नको आणि निरोगी जीवन जगू इच्छित असाल तर तुम्ही काय खात आहात हे सर्वात महत्वाचे आहे. कारण एकदा आपले वजन वाढल्यानंतर, पुन्हा ते कमी करताना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अगोदरच वजन वाढू नये, आणि वाढलेले वजन कसे नियंत्रणात ठेवायचे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.(Want to lose weight? So avoid these things)

आपण अशा  काही गोष्टी आपल्या आहारात घेऊ नये, ज्याने आपले वजन वाढण्याची शक्यता आहे. विशेषत: हिवाळ्यात लोक जास्त खाण्यावर भर देतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. यासाठी आपण आपल्या आहारात कमीतकमी कॅलरी घेणे महत्वाचे आहे.

हिवाळ्यात आपण या गोष्टी टाळाव्या-

गाजर हिवाळ्यात लोक भरपूर प्रमाणात गाजर खातात. तसे, गाजर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. पण गाजराचा हलवा वजन कमी करत नाही तर वजन वाढवतो. गाजर हलवामध्ये 275 कॅलरी असतात. म्हणून हिवाळ्यात गाजरचा हलवा टाळा.

तीळ लोक हिवाळ्यात तिळाचे पदार्थ जास्त प्रमाणात खातात. कारण तीळ गरम आहे आणि गूळाने बनविलेले लाडू खाल्ल्याने शरीर उबदार राहते. तीळाचे लाडू खाणे लठ्ठ व्यक्तींसाठी धोकादायक आहे. कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी असतात. तिळाच्या लाडूत 117 कॅलरी असतात, ज्यामुळे लठ्ठपणाला वाढण्याची शक्यता असते.

चिक्की हिवाळ्याच्या मोसमात चिक्की देखील भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. चिक्की शेंगदाणे आणि गुळापासून बनविलेली असते. त्यात बर्‍याच कॅलरी देखील असतात.  ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. म्हणून लठ्ठ लोकांनी नेहमीच चिक्की खाणे टाळावे.

आजच्या जीवनशैलीमध्ये फिटनेसच खूप महत्व आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे माणसांमध्ये आजारांचे प्रमाणही वाढायला लागले आहे. या सर्वांवर उपाय म्हणजे निरोगी रहाणे. मात्र वजन कमी करणे म्हणजेच फिट राहणे, असा अनेकांचा समज असतो. पण जिम न जाता देखील तुम्ही फिट राहू शकता.

संबंधित बातम्या :

फॅट टू फिट… मुंबईतील 132 किलो ‘वजनदार’ महिला कॉन्स्टेबलचा प्रवास

सानियाचा फिटनेस फंडा, केवळ 5 महिन्यात तब्बल 22 किलो वजन घटवलं

(Want to lose weight? So avoid these things)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.