Weight Loss | वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिताय? मग, दिवसातील ‘या’ वेळा टाळा, अन्यथा होईल हानी!
जर, तुम्हीही लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ग्रीन टी’ पित असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. दररोज एक कप ग्रीन टी सेवन केल्याने, केवळ त्वचाच नव्हे तर केसांनाही फायदा होतो.
मुंबई : जर, तुम्हीही लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ग्रीन टी’ पित असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. दररोज एक कप ग्रीन टी सेवन केल्याने, केवळ त्वचाच नव्हे तर केसांनाही फायदा होतो. परंतु, तुम्हाला माहिती आहे काय की, जर हा ग्रीन टी चुकीच्या वेळी सेवन केला गेला तर, तो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर कमी नुकसानदायी जास्त ठरू शकतो. चला तर, ग्रीन टी पिण्याचा योग्य वेळ आणि योग्य मार्ग कोणता आहे, ते जाणून घेऊया…(Weight loss tips do not drink green tea at these times)
सकाळी रिकाम्या पोटी
सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने आपण लठ्ठपणापासून मुक्त होऊ शकता, असा विचार करणार्यांमध्ये आपणही असाल, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. खरं तर सकाळी ग्रीन टी प्यायल्यास, त्यात उपस्थित अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल शरीरातील गॅस्ट्रीक अॅसिडचे उत्पादन वाढवतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीस पोटाची समस्या उद्भवू शकते. सकाळी ग्रीन टी पिण्यापूर्वी नक्कीच काहीतरी खा आणि त्यानंतरच ग्रीन टी प्या.
झोपायला जाण्यापूर्वी ग्रीन टीचे सेवन
जर, आपल्याला निद्रानाशाची किंवा झोप न येण्याची समस्या असेल, तर झोपण्यापूर्वी ग्रीन टीचे सेवन टाळले पाहिजे. ‘ग्रीन टी’मध्ये उपस्थित असणाऱ्या कॅफिनमुळे झोपेसाठी उपयुक्त असणारा मेलाटोनिन संप्रेरक बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे, झोपेच्या आधी ग्रीन टीचे सेवन केल्यास आपल्या झोपेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
औषधासह किंवा नंतर ग्रीन टी
जर, आपण कोणतेही औषध घेत असाल तर लक्षात घ्या की, आपण ग्रीन टी पिण्यापूर्वी किंवा प्यायल्यानंतर ताबडतोब औषध सेवन करणे टाळले पाहिजे. कारण, औषधांमध्ये उपस्थित रसायने ग्रीन टीसह मिसळतात, आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. ज्यामुळे त्या व्यक्तीला आम्लपित्त होऊ शकते. औषधे नेहमीच साध्या पाण्यासोबत घ्यावीत (Weight loss tips do not drink green tea at these times).
जेवणानंतर किंवा आधी ग्रीन टी
तुम्हाला असे वाटत असेल की, जेवणानंतर ग्रीन टी पिण्यामुळे तुमची लठ्ठपणा कमी होईल, तर तुम्ही चुकीचे आहात. जेवणा बरोबर किंवा नंतर लगेचच ग्रीन टीचे सेवन केल्याने जेवणात उपस्थित पोषकद्रव्ये शोषण्यात अडथळा येऊ शकतो. ज्यामुळे शरीरात पोषक तत्वांचा अभाव भासू शकतो. ग्रीन टी सेवन केल्यानंतर किमान 1 तासानंतरच काहीतरी खायला हवे, हे लक्षात ठेवा.
ग्रीन टीचे सेवन करण्याचा योग्य मार्ग कोणता?
दिवसातून 1 ते 3 कपापेक्षा जास्त ग्रीन टी सेवन करू नये. असे केल्याने शरीराला इजा होऊ शकते आणि ती व्यक्ती शारीरिक दुर्बलतेचा बळी पडू शकते. तसेच ग्रीन टीचे सेवन करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर किमान एक तासाच्या अंतरानेच काहीही पदार्थ खावेत.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Weight loss tips do not drink green tea at these times)
हेही वाचा :
Low Blood Pressure | कमी रक्तदाबाची समस्या? मग, आहारात सामील करा ‘हे’ घटक!
Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…
Obesity | नेहमीपेक्षा 15 मिनिटही कमी झोप वाढवू शकते लठ्ठपणाची समस्या, निर्माण होऊ शकतो रक्तदाबाचा धोका!#Obesity | #weightgain | #BloodPressure | #Sleep | #Healthhttps://t.co/K1LlPzZE2n
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2021