Weight Loss : फक्त या 4 गोष्टी काटेकोरपणे पाळा, पाहा वजन कसे झटपट कमी होते!

लठ्ठपणा ही वाढलेली सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. चुकीचे खाणे आणि शारीरिक हालचाली अत्यंत कमी झाल्यामुळे लठ्ठपणाची (Weight) समस्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, थायरॉईड, संधिवात, कोलेस्ट्रॉल, बीपी अशा सर्व समस्या निर्माण होतात आणि आपले शरीर (Body) आजारांचे माहेर घर होते.

Weight Loss : फक्त या 4 गोष्टी काटेकोरपणे पाळा, पाहा वजन कसे झटपट कमी होते!
वजन कमी करण्यासाठी या टिप्स फाॅलो करा. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 1:27 PM

मुंबई : लठ्ठपणा ही वाढलेली सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. चुकीचे खाणे आणि शारीरिक हालचाली अत्यंत कमी झाल्यामुळे लठ्ठपणाची (Weight) समस्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, थायरॉईड, संधिवात, कोलेस्ट्रॉल, बीपी अशा सर्व समस्या निर्माण होतात आणि आपले शरीर (Body) आजारांचे माहेर घर होते. जर तुम्हाला या समस्या टाळायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करावे लागतील. सर्व संशोधनातून असे दिसून आले आहे की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या खाण्याच्या सवयी सुधारल्या तर लठ्ठपणावर सहज मात करता येते. आज आपण वजन कमी करण्यासाठी असलेल्या सुपरफूडबद्दल (Superfood) जाणून घेणार आहोत.

ग्रीन टी

ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होते, हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. मात्र, आपल्यापैकी अनेकजण ग्रीन टीचे सेवन सकाळी उपाशी पोटी करतात आणि मग काय…दिवसभर दुधाचा चहा सतत पितात. याचा परिणाम असा होतो की, यामुळे आपले वजन कमी होण्यापेक्षा अधिक वाढते. जर आपण ग्रीन टीचे सेवन वजन कमी करण्यासाठी करत आहात? तर आपण दुधाचा चहा पिणे सोडलेच पाहिजे.

कलिंगड

कलिंगडचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. विशेष म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कलिंगड सहजपणे आपल्याला बाजारामध्ये मिळते. यामुळे या हंगामात आपण कलिंगडचे जास्तीत-जास्त सेवन करायला हवे. यात सर्व पोषक तत्वे असतात आणि भरपूर पाणी असते. हे तुमचे शरीर हायड्रेट ठेवते. त्वचा उजळते आणि वजन कमी करण्यास उपयुक्त मानले जाते.

दही

दह्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. प्रथिने युक्त गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया वाढून तुमचे वजन कमी होते, दही तुमच्या पोटासाठीही चांगले मानले जाते. पोट स्वच्छ ठेवल्याने तुम्ही सर्व समस्यांपासून वाचता. यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्न करत असाल तर दह्याचा नक्कीच आहारात समावेश करा. दही ही वजन कमी करण्यासाठी सुपरफूड मानले जाते.

व्यायाम

या सर्व पदार्थांचा आहारात समावेश करण्यासोबतच बाहेरचे अन्न, तळलेले पदार्थ खाणे टाळावे. हिरव्या भाज्या आणि अधिकाधिक फळे खा, भरपूर पाणी प्या आणि व्यायामासाठी थोडा वेळ काढा, तरच या गोष्टी परिणामकारक ठरतात. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे म्हणजे व्यायाम. व्यायाम केल्याशिवाय वजन कमी करणे खूप जास्त अवघड काम आहे.

संबंधित बातम्या : 

Health Care Tips : निरोगी आयुष्य जगण्यासाठी या 3 जीवनसत्त्वांचा आहारात समावेश हवाच!

Curd : उन्हाळ्यात दह्याचा आहारामध्ये समावेश करा आणि केस, त्वचा, आरोग्य चांगले मिळवा!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.