केस गळतीची समस्या दूर करण्यापासून ते रक्तदाब कमी करण्यापर्यंत पांढऱ्या कांद्याचे अनेक फायदे, वाचा याबद्दल सविस्तर!
कांदा हा स्वयंपाक घरामधील महत्वाचा घटक आहे. कांदा खाद्यपदार्थांमध्ये वापरल्यानंतर एक खास चव पदार्थाला येते. संशोधकांच्या मते, पांढरा कांदा व्हिटॅमिन-सी, फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सचा चांगला स्रोत आहे. कांद्यामधील फ्लेव्होनॉइड्स स्ट्रोक आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करण्यात मदत करतात.
मुंबई : कांदा हा स्वयंपाक घरामधील महत्वाचा घटक आहे. कांदा खाद्यपदार्थांमध्ये वापरल्यानंतर एक खास चव पदार्थाला येते. संशोधकांच्या मते, पांढरा कांदा व्हिटॅमिन-सी, फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सचा चांगला स्रोत आहे. कांद्यामधील फ्लेव्होनॉइड्स स्ट्रोक आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करण्यात मदत करतात. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारामध्ये पांढऱ्या कांद्याचा समावेश करा.
-पांढऱ्या कांद्यामध्ये असलेले क्रोमियम आणि सल्फर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पांढर्या कांद्याचे नियमित सेवन मधुमेह किंवा प्री-डायबेटिक रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच, कांद्यामधील विविध संयुगे, जसे की क्वेर्सेटिन आणि सल्फर मधुमेह दूर करण्यास मदत करतात.
-पांढरा कांदा वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. विशेष: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी. ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे. त्यांनी पांढऱ्या कांद्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा.
-पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फर संयुगे आणि फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट असतात. त्यात कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहेत. याशिवाय कांद्यामधील फेसेटीन आणि क्वेर्सेटिन, फ्लेव्होनॉइड्स, ट्यूमरची वाढ रोखू शकतात.
-पांढऱ्या कांद्याचा रस केस गळणे कमी करण्यास आणि केस सुंदर करण्यास मदत करतो. यासाठी आपल्याला कांद्याच्या रसामध्ये खोबरेल तेल मिक्स करून केसांना लावावे लागेल.
-पांढरा कांदा फायबर आणि प्रीबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे. हे आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. शिवाय, कांद्यामध्ये प्रीबायोटिक इन्युलिन आणि फ्रुक्टोअल्जियोसॅकराइड्स भरपूर असल्याने त्याचे नियमित सेवन केल्याने आतडे चांगले राहण्यास देखील मदत होते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक