मकर संक्रांतीच्या दिवशी का खाल्ली जाते खिचडी? जाणून घ्या खिचडी खाण्याचे शरीराला होणारे फायदे
अनेक ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाण्याची परंपरा आहे. सांस्कृतिक परंपरे सोबतच त्यामागे आरोग्यदायी फायदे देखील आहे. खिचडीचे सेवन केल्याने हिवाळ्यात शरीराला पोषण तर मिळतेच पण खिचडी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
मकर संक्रांत हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे जो दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. हा सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचे प्रतीक आहे. मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते. मकर संक्रांतीला कापणीचा सण देखील म्हटले जाते. मकर संक्रांत हा सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केल्या जातो. परंतु उत्तर भारतात खिचडी खाण्याची आणि दान करण्याची विशेष परंपरा आहे.
खिचडीचा संबंध केवळ मकर संक्रांतीच्या सणाशी नाही तर त्यामागे अनेक सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक कारणे देखील आहेत. हिवाळ्यामध्ये खिचडीचे सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळते. त्यासोबतच ते एक संपूर्ण पौष्टिक अन्न देखील आहे. जाणून घेऊ खिचडी खाण्याचे काही फायदे आणि मकर संक्रांतीला खिचडी का खाल्ली जाते याचे कारण.
मकर संक्रांतीला खिचडी खाण्याची परंपरा
मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी डाळ, तांदूळ आणि तीळ यांची खिचडी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाणे शुभ मानले जाते. उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये या दिवशी खिचडी बनवण्याची आणि खाण्याची परंपरा आहे. कारण हा सण सूर्यदेवाच्या उपासनेचा प्रतीक मानला जातो. तिळ,गुळ आणि दही टाकून खिचडी खाल्ली जाते. जी चवीला चांगली लागतेच पण त्यासोबत ती आरोग्यासाठी ही फायदेशीर मानली जाते.
खिचडीचे आरोग्याला होणारे फायदे
पचायला सोपी : खिचडी हलकी आणि पचायला सोपी असते. त्यामुळे पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत होते. हिवाळ्यात जड आणि मसालेदार अन्न अनेकदा पोटासाठी त्रासदायक ठरते त्यामुळे खिचडी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.
पोषक तत्त्वांनी समृद्ध : खिचडी मध्ये तांदूळ आणि डाळीचे मिश्रण प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचा चांगला स्त्रोत बनवते. त्यात तीळ आणि तूप टाकल्याने त्याची पौष्टिकता आणखीन वाढते.
शरीराला उबदार ठेवते
मकर संक्रांतीच्या काळामध्ये थंडी वाढलेली असते. त्यामुळे तीळ आणि उडीद डाळ यापासून बनवलेल्या खिचडीचे सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळते आणि थंडीपासून बचाव होतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: खिचडी मध्ये असलेली कडधान्य आणि तीळ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच शरीराला इन्फेक्शनशी लढण्यास सक्षम बनवतात.
ऊर्जा प्रदान करते: खिचडी मध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. ज्यामुळे ऊर्जा मिळते हे हिवाळ्यात आळस आणि थकवा जाणवू देत नाही.