महिलांनो आराहात ‘या’ सुपरफूडचा समावेश करावा, रोगप्रतिकारक शक्तीसोबतच त्वचाही चमकेल!

पौष्टिक आहार शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर काही पदार्थ असे आहेत जे स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.

महिलांनो आराहात 'या' सुपरफूडचा समावेश करावा, रोगप्रतिकारक शक्तीसोबतच त्वचाही चमकेल!
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 10:39 AM

मुंबई : पौष्टिक आहार शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर काही पदार्थ असे आहेत जे स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. हे पदार्थ केवळ रोग प्रतिकारक शक्ती वाढवत नाहीत तर मानसिक तंदुरुस्त देखील ठेवतात. चला तर मग जाणून घेऊयात हे नेमके कोणते पदार्थ आहेत. जे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. (Women should include ‘this’ superfood in their diet to help boost the immune system)

डार्क चॉकलेट जास्त करून महिलांना चॉकलेट खाण्यासाठी आवडते. त्याचबरोबर डार्क चॉकलेट देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. डार्क चॉकलेटमध्ये बर्‍याच रोगांशी लढण्याची क्षमता असते. तसेच डार्क चॉकलेटमुळे आपला तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे महिलांनी आपल्या आहारात डार्क चॉकलेटचा समावेश जास्तीत-जास्त करावा.

सफरचंद महिलांनी आपल्या आहारात सफरचंदचे सेवन केले पाहिजे. सफरचंदमध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गर्भधारणेदरम्यान महिलांनी सफरचंद खावे. त्यात क्लोरीन, लोह, लोह, मॅग्नेशियम आणि फोलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. जे गर्भधारणेदरम्यान रोगांपासून बचाव करतात. तसेच अशक्तपणा दूर करते.

पालक पालकात ल्युटीन असते. यात अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे आपल्या त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. याशिवाय पालकांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ए, बी, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी पोषक पदार्थ असतात. ते शरीरासाठी चांगले आहेत. पालकात अँटी-ऑक्सिडेंट देखील असतात. ते सूर्यप्रकाशामुळे होणार्‍या हानीचे डोळ्यांचे रक्षण करते.

मशरूम मशरूममध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आढळतात. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. मशरूम खाल्ल्याने स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. मशरूममध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, लोह आणि इतर अनेक खनिजे असतात. जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

दूध आणि दही दूध आणि दही हाडे आणि दात यांच्यासाठी आरोग्यदायी आहेत. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, थायमिन, राइबोफ्लेविन, फोलेट, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी असते. दही हा प्रोबायोटिक आहार आहे. हे पचनसंस्थेसाठी देखील चांगले आहे. दूध आणि दही महिलांनी आहारात घेतले पाहिजे.

सोयाबीन सोयाबीनमध्ये लोह, फोलेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोकाही कमी होतो. स्त्रियांनीही सोयाबीनचे सेवन केले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

(Women should include ‘this’ superfood in their diet to help boost the immune system)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.