आयुष्य व्यस्तय, जपानी लोकांसारखं कशालाच वेळ नाही, मग सेक्ससाठी वेळ कसा काढणार? वाचा ही नवी जीवनशैली

कामाच्या व्यापात सेक्स न केल्यामुळे जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव येऊ शकतो (What is schedule sex).

आयुष्य व्यस्तय, जपानी लोकांसारखं कशालाच वेळ नाही, मग सेक्ससाठी वेळ कसा काढणार? वाचा ही नवी जीवनशैली
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 11:23 AM

मुंबई : काम! काम! आणि काम! कामामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रचंड व्यस्त असतो. अनेकांची मोठमोठी स्वप्न असतात. त्यामुळे ते त्या स्वप्नांचा पाठलाग करत प्रचंड मेहनत आणि काम करत असतात. या कामांमुळे त्यांना इतर काहीच गोष्टी करता येत नाहीत. अनेकांना तर सेक्स करण्यासाठी देखील वेळ नसतो. जपानी व्यक्ती जसे कामात व्यस्त असतात अगदी तसेच काही लोक कामात व्यस्त असतात. मात्र, कामाच्या व्यापात सेक्स न केल्यामुळे जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव येऊ शकतो. तसं होऊ नये म्हणून शेड्यूल सेक्स (Schedule Sex)  हा त्यावर उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे जगभरातील अनेक जोडपं या शेड्यूल सेक्स या नव्या जीवनशैलीचा स्वीकारही करत आहेत. त्यामुळे ही जीवनशैली जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे (What is schedule sex).

सतत कामात व्यग्र असणाऱ्या व्यक्तीसाठी शेड्यूल सेक्स (Schedule Sex) खूपच फायदेशीर आहे. शेड्यूल सेक्समुळे जोडीदारासोबतचं नातं देखील घट्ट राहतं. आजकाल अनेक लोक शेड्यूल सेक्सचा अवलंब करतात. या शेड्यूल सेक्सचे अनेक फायदे आहे. त्याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत (What is schedule sex).

शेड्यूल सेक्स म्हणजे नेमकं काय?

कामात व्यस्त असल्याने अनेकजण सेक्सकडे दुर्लक्ष करतात. पण यामुळे सेक्स लाईफ डिस्टर्ब होते. याशिवाय जोडीदारासोबतही तणाव वाढू शकतो. त्यावर तोडगा म्हणून काहीजण सेक्ससाठी वेळ ठरवून घेतात. एकमेकांची वेळ जुळवून एखाद्या विशिष्ट दिनी ते सेक्स करण्याचं ठरवतात. त्यालाच शेड्यूल सेक्स असं म्हणतात.

शेड्यूल सेक्सचे फायदे काय?

शेड्यूल सेक्सचे अनेक फायदे आहेत. यामुळे सेक्स करण्याची वेळ फिक्स होते. याशिवाय यामुळे दोघांमधील नातं देखील जास्त घट्ट होतं. अनेकांची लाँग डिस्टन्स रिलेशनशिप असते. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणजे पार्टनर एकमेकांपासून भरपूल लांब राहतात. या रिलेशनशिपमध्ये लोकांना आपल्या जोडीदाराला भेटता येत नाही. त्यामुळे अशा लोकांसाठी शेड्यूल सेक्स हा चांगला पर्याय आहे.

शेड्यूल सेक्स करण्याचा एक वेगळाच आनंद असतो. यामागील कारण म्हणजे शेड्यूल सेक्स करण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवण्यात आलेला असतो. शेड्यूल सेक्ससाठी अगोदरच तयारी करता येऊ शकते, जेणेकरुन सेक्सचा पूर्ण आनंद घेता येईल.

विशेष म्हणजे शेड्यूल सेक्समुळे तुम्ही पार्टनरसाठी वेगळा वेळ देऊ शकता. सध्याच्या या डिजीटल युगात समोरासमोर भेटून एकमेकांना वेळ देणं हे फार कठीण होऊन बसलं आहे. अनेकजण सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. मात्र, शेड्यूल सेक्समुळे तुम्ही जोडीदाराला वेळ देऊ शकतात. जोडीदाराशी मनसोक्तपणे बोलू शकता.

हेही वाचा : हे 6 रोग करु शकतात तुमची सेक्स लाईफ खराब, सावध राहा!

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.