जन्माला येण्याआधीच मोठी स्पर्धा, यशस्वी होण्यासाठी ‘स्पर्म’चीही असते शर्यत!

टी- हॅप्लोटाईप अनुवांशिक घटक असलेला शुक्राणू त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगवान आणि गर्भाधानात अधिक आक्रमक असतो.

जन्माला येण्याआधीच मोठी स्पर्धा, यशस्वी होण्यासाठी ‘स्पर्म’चीही असते शर्यत!
कोणत्याही जीवाची जन्माला येण्यापूर्वीच स्पर्धा सुरू होते.
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 12:39 PM

मुंबई : कोणत्याही जीवाची जन्माला येण्यापूर्वीच स्पर्धा सुरू होते. तो एक शुक्राणू म्हणजेच ज्यामुळे आपले शरीर तयार होते, कदाचित त्याने या स्पर्धेतील अनेक प्रतिस्पर्ध्यांना विष देऊन मारले देखील असेल. वाचून आश्चर्य वाटले ना? कोणत्याही जीवाच्या जन्माची सुरूवात ही एका भयानक स्पर्धेने होते. चला तर, जाणून घेऊया या स्पर्मांबद्दल, जे त्यांच्या प्रतिस्पर्धींना विष देवून ठार मारतात…( Know about Sperm race to entering in egg cell)

बर्लिनच्या संशोधकांनी असा अहवाल दिला आहे की, प्रजनन प्रक्रियेदरम्यान जेव्हा पुरुषातून वीर्य बाहेर पडते तेव्हा कोट्यावधी शुक्राणू अंडी पेशीकडे जातात. हे सर्व खूप वेगात असतात. प्रत्येकाची अशी इच्छा असते की त्यांनी अंड्यांच्या पेशीसह एक नवीन जीव तयार केला पाहिजे. पण यापैकी केवळ एकाच शुक्राणूला यश मिळते. अंडी पेशीपर्यंत पोहचण्याची क्षमता शुक्राणूंमध्ये उपस्थित असलेल्या प्रथिने RAC1च्या प्रमाणावर अवलंबून असते.

जर RAC1च्या प्रोटीनचे प्रमाण योग्य असेल तर प्रत्येक शुक्राणूंची शक्ती आणि वेग चांगला असतो. जर ते प्रथिने नसले तर, नपुंसकत्व निर्माण होते. जेव्हा शुक्राणू अंडी पेशीकडे म्हणजे गर्भाशयात पोहण्यास प्रारंभ करतात, तेव्हा केवळ नशीब त्यांना आधार देत नाही. त्यावेळी प्रत्येक शुक्राणूंची स्पर्धात्मक क्षमता देखील महत्त्वाची असते.

उंदरांवर संशोधन

उंदीरांवर केलेल्या या अभ्यासानुसार काही शुक्राणू खूप सेल्फिश अर्थात स्वार्थी असतात. हे त्यांना एका विशिष्ट प्रकारच्या डीएनएवर अवलंबून आहे. हा डीएनए अनुवांशिक वारसाचे नियम तोडतो. तसेच तो शुक्राणूंचा यशस्वी दर निश्चित करतो.

आण्विक जेनेटिक्सच्या बर्लिन-मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमधील या अभ्यासानुसार ‘टी-हॅप्लोटाईप’ नावाच्या अनुवंशिक घटक गर्भाधानातील यशाचे निर्धारण कसे करता येईल याचे नियंत्रण करतो. पहिल्यांदाच संशोधकांना असे कळले की ज्यामध्ये ‘टी- हॅप्लोटाईप’ हा अनुवांशिक घटक असतो, असा शुक्राणू अधिक शक्तिशाली असतो.

टी- हॅप्लोटाईप अनुवांशिक घटक असलेला शुक्राणू त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगवान आणि गर्भाधानात अधिक आक्रमक असतो. तो थेट त्याच्या ध्येयांकडे जातो. ते कुणालाही पुढे जाऊ देत नाहीत. ‘टी- हॅप्लोटाईप’ अनुवंशिक घटक आणि RAC1 प्रोटीन असलेल्या शुक्राणूमधून रासायनिक सिग्नल सोडले जातात, ज्यामुळे अंड्यांच्या पेशीचा थेट आणि सुरक्षित मार्ग सूचित होतो.

मॉलिक्युलर जेनेटिक्स मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटचे संचालक बर्नहार्ड हर्मन यांनी नमूद केले आहे की, ‘टी- हॅप्लोटाईप’ अनुवांशिक घटक असलेले शुक्राणू जनुकीय घटक नसलेल्या प्रतिस्पर्ध्यांना निष्क्रिय करतात. म्हणजेच ते त्यांना विष देतात आणि ठार मारतात (Know about Sperm race to entering in egg cell).

अटी-तटीची स्पर्धा

बर्नहार्डने नमूद केले की, टी- हॅप्लोटाईप शुक्राणू इतर शुक्राणूंना विष देऊन मारतात. त्याच वेळी, ते एक उतारा काढून टाकतात जेणेकरून ते स्वतःस सुरक्षित राहतील. म्हणजेच, कोणतेही शुक्राणू त्यांचे लक्ष विचलित करू शकत नाही आणि त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत. म्हणजेच या शर्यतीत उतरलेल्या इतर स्पर्धकांना विषारी पाणी पाजून मारून टाकावे, अशी ही स्पर्धा असते.

‘टी-हॅप्लोटाईप’ शुक्राणू सिग्नल रोखणारे जनुक रूपे असतात. या अडथळ्यामुळे, इतर शुक्राणू त्यांच्या मार्गावर भटकतात आणि मारले जातात. हा अनुवांशिक घटक असलेल्या काही शुक्राणूंमध्ये गुणसूत्रांची निम्मी संख्या असते. परंतु त्यांच्यात नकारात्मक प्रक्रियेस उलट करण्याची शक्ती आहे. यामुळे तो शेवटपर्यंत स्पर्धेत टिकून राहतो (Know about Sperm race to entering in egg cell).

‘जो जिता वही सिकंदर’…

केवळ RAC1 समृद्ध असलेली शुक्राणू अंडी पेशीकडे वेगाने धावतात. जर त्यांच्यामध्ये टी-हॅप्लोटाइप हा अनुवांशिक घटक असेल, तर तो अधिक वेगवान आणि आक्रमक प्रतिस्पर्धी बनतो. जर हा घटक नसेल तर तो सामान्य पद्धतीने या स्पर्धेत भाग घेतो.

या अभ्यासाचा परिणाम असा झाला की, ‘टी- हॅप्लोटाईप’ घटक आणि RAC1 असलेल्या शुक्राणूंनी स्पर्धा वेगाने जिंकली. तथापि, सामान्य शुक्राणू हे करू शकत नाहीत. यामुळे ते अर्ध्या शर्यातीतच मारले जातात.

बर्नहार्ड म्हणाले की, आमचा अभ्यास दर्शवतो की, जेव्हा गर्भधारणेची वेळ येते तेव्हा हे शुक्राणू खूप क्रूर बनतात. त्यानंतर टी-हॅप्लोटाईप अनुवांशिक घटक असलेले शुक्राणू नंतर विजेते बनतात. हे शुक्राणू स्पर्धकांना विषबाधा करून मारतात. म्हणजेच नवीन जन्माची सुरुवात ते एक क्रूर मार्गाने करतात.

(Know about Sperm race to entering in egg cell)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.