कोरफडीच्या जास्त वापराने फायद्याऐवजी होतं नुकसान, त्वचा आणि आरोग्यासाठी ठरते घातक

कोरफड ही अनेक पोषक गुणधर्मांनी युक्त असते. त्याचे जेल लावल्याने व सेवन केल्यानेही बरेच फायदे होतात. पण त्याच्या अतिसेवनामुळे नुकसानही होऊ शकतं.

कोरफडीच्या जास्त वापराने फायद्याऐवजी होतं नुकसान, त्वचा आणि आरोग्यासाठी ठरते घातक
कोरफडीच्या अतिवापराचे तोटेImage Credit source: freepik
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 4:25 PM

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : कोरफड (Aloe vera) ही अतिशय औषधी आणि बहुगुणी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्याचा केवळ त्वचेसाठीच नव्हे तर आरोग्यासाठी वापर केला जातो. यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे जखमा लवकर भरतात. आपल्याला त्याचे अनेक फायदे (benefits) माहित आहेत, परंतु त्याचा अतिवापर केल्याने केवळ आपले आरोग्यच नाही तर आपली त्वचा देखील (side effects) खराब होऊ शकते.

कोरफडीचे तोटे जाणून घेऊया

पोटाच्या समस्या

कोरफडीच्या पानांमध्ये लेटेक्स असते, त्याचे अतिसेवन केल्यास पोटात त्रास होऊ शकतो. काही वेळा पोटात जळजळ, वेदना होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोरफडीच्या गराचे सेवन करू नये.

डिहायड्रेशन

उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या देखील जीवघेणी ठरू शकते. त्यामुळेच या ऋतूत अधिकाधिक पाणी आणि ज्यूस पिण्याचा आणि रसदार फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या ऋतूत कोरफडीचे सेवन हानिकारक असते. .

त्वचेचे होते नुकसान , पिंपल्सवर लावू नये

चेहऱ्यावर खूप डाग व पिंपल्स असतील तर चुकूनही कोरफडीचा गर जास्त लावू नये. यामुळे चेहऱ्यावर खाज आणि ॲलर्जी होऊ शकते.

तेलकट त्वचा

काही लोकांची त्वचा तेलकट असते. अशा त्वचेला कोरफडीचे जेल सूट होत नाही. अशा स्थितीत हे जेल लावल्याने खाज येणे आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच कोरफडीच्या गराचा वापर करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.