लहान मुलांनाही होऊ शकतो झोपेचा विकार, अशी ओळखा लक्षणं

झोप न येण्याच्या समस्येला स्लीप डिसऑर्डर असे म्हटले जाते. हा त्रास केवळ मोठ्यांनाच नव्हे तर लहान मुलांनाही होऊ शकतो.

लहान मुलांनाही होऊ शकतो झोपेचा विकार, अशी ओळखा लक्षणं
Follow us
| Updated on: Oct 10, 2022 | 9:24 AM

अनेक वेळा दिवसभराच्या थकव्यानंतरही काही व्यक्तींना झोप (sleep) येत नाही. निद्रानाशाच्या किंवा झोप न येण्याच्या या समस्येला स्लीप डिसऑर्डर (sleep disorder) या नावाने ओळखले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा त्रास केवळ प्रौढ व्यक्तींनाच नव्हे तर मुलांनाही (small kids) होऊ शकतो. स्लीप डिसऑर्डरचे कारण हे झोप न येण्यामुळे झालेली चिडचिड, राग येणे, अन्न पचन व्यवस्थित न होणे, पोटाच्या समस्या हेही असू शकते. वर नमूद केल्याप्रमाणे लहान मुलांनाही हा त्रास होऊ शकतो, त्यांच्यामध्ये या समस्येची लक्षणे वेगवेगळी दिसू शकतात. या लेखाच्या माध्यमातून त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.

लहान मुलांमध्ये दिसू शकतात ही लक्षणं :

– जर मूल रात्री वारंवार झोपेतून उठत असेल किंवा त्याला पुन्हा झोपताना त्रास होत असेल, तर त्याला झोपेच्या विकाराची समस्या उद्भवू शकते.

हे सुद्धा वाचा

– जर एखाद मूल दिवसभरात 10 ते 15 मिनिटांत अनेकवेळा डुलकी घेत असेल तर तेही झोपेच्या विकाराचे लक्षण असू शकते.

– मूल चिडचिड करत असेल आणि छोट्या-छोट्या गोष्टींबाबत रागावत असेल.

– खेळणे, उड्या मारणे याऐवजी मूल जर बराच वेळ एका जागी शांत बसून राहिल असेल.

ही असू शकतात कारणं :

औषधांचे दुष्परिणाम – ऋतुमानानुसार होणारे आजार किंवा पोटाच्या समस्येमुळे पालक मुलांना औषधे देऊ लागतात. त्या औषधांच्या हेवी डोसमुळे मुलांना झोप कमी लागते.

आपल्या सभोवतालचे वातावरण – झोपेच्या समस्येसाठी आपल्या सभोवतालच्या वातावरणही खूप महत्त्वाचे ठरते. अनेक वेळा आजूबाजूला खूप गोंगाट असतो, तापमान खूप गरम असते. या कारणांमुळेही मुलांची झोपही बिघडू शकते. त्यामुळे मुलांना झोपवताना आजूबाजूचं वातावरण शांत राहील याची विशेष काळजी घ्यावी.

कॅफेन – काही मुलांना अनेकदा शीतपेयं प्यायची आवड असते. एनर्जी ड्रिंक्स आणि सोडा ड्रिंक्समध्ये यामध्ये कॅफेनचं प्रमाण खूप असतं. कॅफेनचे सेवन हे देखील लहान मुलांना झोप न येण्याचे कारण असू शकतं.

लहान मुलांसाठी किती झोप गरजेची ? प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची असते. लान मुलांबाबत तर हे जास्त महत्वाचे ठरते. एखादं मूल किती वेळ झोपतं हे त्याच्या वयावरही अवलंबून असते. १ वर्षापर्यंतची मुलं १२-१४ तास झोपतात. तर ३ ते ५ वर्षे वयाच्या मुलांना १०-१२ तास आणि ६-१२ वर्षांच्या मुलांना ९-११ तास झोप योग्य असते. तसेच १३-१६ वर्षांची मुले १० तास झोप घेतात. त्यामुळे मुलांच्या झोपेची वेळ सांभाळणे व त्यांना पुरेशी झोप मिळते की नाही हे पाहणे महत्वाचे आहे.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.