Foods Causes Stress and Anxiety: ‘ या ‘ पदार्थांमुळे वेगाने वाढतो स्ट्रेस, जाणून घ्या माहिती

कृत्रिम साखर असलेल्या काही पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे स्ट्रेस, डिप्रेशन आणि एंक्झायटी वाढण्याचा धोका असतो.

Foods Causes Stress and Anxiety: ' या ' पदार्थांमुळे वेगाने वाढतो स्ट्रेस, जाणून घ्या माहिती
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 3:20 PM

आजकाल व्यस्त लाईफस्टाइलमुळे (busy lifestyle) लोकांच्या सवयी बदलल्या असून लोकांना ताण आणि अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसं पहायला गेलं तर तणाव किंवा स्ट्रेस (stress) वाढण्याची अनेक सामान्य कारणेदेखील असू शकतात. रोजच्या दिनचर्येत होणारे बदल, एकटेपणा आणि दीर्घकाळ टिकणारे शारीरिक आजार इत्यादी. या सर्वांमध्ये, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी हे तणाव आणि चिंतेचे सर्वात मोठे कारण बनू शकते. निकृष्ट पदार्थ (food) खाल्यामुळे शारीरिक समस्या तर वाढतातच, पण त्याचा मेंदू आणि मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

आपल्या शरीराची गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टम ही थेट मेंदूशी जोडलेली असते. कृत्रिम स्वीटनर्स हे साखरेला कृत्रिम पर्याय आहे आणि त्यामध्ये कॅलरी देखील जास्त असतात. त्यांचे सेवन केल्याने तणाव आणि नैराश्याची लक्षणे दिसू शकतात. काही अशा पदार्थांविषयी जाणून घेऊया, ज्यामुळे तणाव शकतो.

या पदार्थांमुळे वाढू शकतो तणाव –

हे सुद्धा वाचा

कॉफी आणि चहा – जीक्यू इंडिया डॉट कॉम नुसार, फ्रेश वाटावं म्हणून लोक बऱ्याचदा कॉफी किंववा चहाचे सेवन करतात. मात्रं सत्य हे आहे की कॅफेनमुळे प्रत्यक्षात खूप तणाव निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला, यामुळे ॲड्रेनालाईनला प्रोत्साहन मिळ, पण नंतर तुम्हाला ताण येऊ शकतो तसेच चिंता वाटू शकते. कॅफेनच्या अत्यधिक सेवनामुळे तुमच्या शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे हृदयाची धडधड वेगवान होते.

सॉफ्ट ड्रिंक्स – कृत्रिम साखरेचा आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. कृत्रिम साखरेचे सेवन केल्याने याचा वापर केल्याने शरीरात जळजळ, सूज आणि तणाव देखील वाढू शकतो. मधुमेह झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती सहसा कमकुवत असते. अशा परिस्थितीत कृत्रिम साखरेच्या सेवनाने मधुमेहाच्या रुग्णांची रक्तातील साखर तर वाढतेच त्याशिवाय खोकला आणि सर्दीचाही त्रास होतो.

तेलकट पदार्थ आणि फास्ट फूडमुळे वाढू शकतो त्रास – तेलकट पदार्थ खाल्यामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशनची पातळी वाढू शकते. चिप्स, चिकन नगेट्स , बर्गर आणि पिझ्झा इत्यादी पदार्थांचे सेवन करू नये, कारण त्यामध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण अधिक असते. ट्रान्स फॅट हे आपल्या शरीरात जळजळ होण्याचे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे आपल्याला तणाव आणि चिंतेचा सामना करावा लागू शकतो.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....