परदेशी असलेला कापूर भारतात कसा आला? फारच रंजक आहे इतिहास

हिंदू धर्मामध्ये कोणतीही धार्मिक पूजा असो किंवा कोणतेही हवन असो ते कापुराशिवाय पूर्ण होत नाही. अनेक घरांमध्ये रोज सकाळ संध्याकाळ पूजा केल्यानंतर कापूर आवर्जून जाळल्या जातो. जाणून घेऊयात या कापराचा इतिहास

परदेशी असलेला कापूर भारतात कसा आला? फारच रंजक आहे इतिहास
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 8:18 PM

अनेक घरांमध्ये दररोज सकाळी पूजा करताना कापूर वापरला जातो. घरामध्ये कापूर जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरात प्रसन्न वाटते. कोणतीही पूजा किंवा हवन कापूर शिवाय पूर्ण होत नाही. पण हा कापूर कसा तयार केला जातो हे अनेक जणांना माहीत नाही. जाणून घेऊया कापूर कशाप्रकारे तयार केला जातो.

कापूरचे झाड कुठून आले?

कापूरचे झाड पूर्व आशिया विशेषतः चीनमध्ये सापडतात. काही वनस्पती शास्त्रज्ञ ते मूळ जपानचे असल्याचे सांगतात. एक मनोरंजक तथ्य असे आहे की एकेकाळी कापूरच्या झाडापासून आईस्क्रीम बनवली जायची आणि ती चीनच्या तांग राजवंश दरम्यान अत्यंत लोकप्रिय होती. त्याचा वापर इतरही अनेक गोष्टींसाठी केला गेला आहे. चिनी लोक औषधांमध्ये त्याचा विविध रूपात अजूनही वापर करतात. नवव्या शतकाच्या आसपास कापूरच्या झाडापासून कापूर बनवण्यास सुरुवात झाली आणि नंतर हळूहळू ते जगभर पसरली.

कापूर कसा तयार होतो?

बाजारात दोन प्रकारचे कापूर उपलब्ध आहेत एक नैसर्गिक कापूर आणि दुसरा कृत्रिम रित्या कारखाना तयार केला जाणारा कापूर. नैसर्गिक कापूर एका खास झाडापासून बनवला जातो ज्याला कापूरवृक्ष असे म्हणतात. कापूरचे वैज्ञानिक नाव Cinnamomum Camphora आहे. कापूरच्या झाडाची उंची ही साधारण पन्नास ते साठ फुटांपर्यंत असते आणि त्याची गोलाकार पाने चार इंच रुंद असू शकतात. झाडाच्या सालापासून कापूर तयार केला जातो. जेव्हा झाडाची साल सुकायला लागते किंवा राखाडी दिसू लागते तेव्हा ती झाडापासून काढून टाकली जाते. यानंतर ती साल गरम करून त्याला पावडर मध्ये रूपांतरित केले जाते आणि त्या पावडरला कापूराचा आकार दिला जातो.

कापूरचे झाड भारतात कसे आले?

भारतामध्ये ही कापूर उत्पादनावर संशोधन सुरू होते. 1932 मध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये कोलकत्ता येथील स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे आर एन चोप्रा आणि मुखर्जी लिहितात की 1882-83 मध्ये लखनऊच्या बागायती बागेत कापूर उत्पादक झाडांची यशस्वी लागवड करण्यात आली होती. मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. पण प्रयत्न सुरू राहिले आणि काही वर्षातच विविध भागात कापूर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली.

कापूरच्या झाडाला काळे सोने का म्हणतात?

कापूरच्या झाडाला काळे सोने असेही म्हणतात. जगातील सर्वात मौल्यवान वृक्षांमध्ये कापूरच्या झाडाशी गणना केली जाते. केवळ पूजेत वापरण्यात येणारा कापूर नाही तर इतरही अनेक गोष्टी या झाडापासून तयार केल्या जातात. या झाडापासून आवश्यक तेला सोबतच विविध प्रकारची औषधे, परफ्युम, साबण इत्यादी ही तयार केले जातात. कपूरच्या झाडांमध्ये सहा प्रकारची रसायने आढळतात. या सर्व गुणधर्मामुळे कापूरच्या झाडाला काळे सोने असे म्हटले जाते.

कापूर लगेच का जळतो?

कापूर मध्ये कार्बन आणि हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्याचे ज्वलन तापमान खूपच कमी असते. म्हणजेच थोडीशी उष्णता मिळाली की कापूर लगेच जळू लागतो. कापूर हा अत्यंत वाष्पशिल पदार्थ आहे. जेव्हा कापूराला गरम केले जाते तेव्हा ते बाष्प बनते आणि हवेत वेगाने पसरते. त्यात ऑक्सिजन मिसळल्याबरोबर ते सहज जळायला लागते.

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.