काय तुमची मासिक पाळी अजून आली नाही…मग ही धोक्याची घंटा
जर मासिक पाळी मिस झाली तर ही धोक्याची घंटा आहे. खास करुन लग्न झालेल्या महिलांनासाठी. मासिक पाळी अनियमित नाही, ती मिस होते असं मुली सांगताना आपण ऐकत असाल. गेल्या काही वर्षात ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याची कारणे वेगवेगळी आहेत. गेल्या काही वर्षात ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याची कारणे वेगवेगळी आहेत. बदललेली जीवनशैली याचा मासिक पाळीवर परिणाम होतो.
मुंबई : मासिक पाळी म्हणजेच पीरियड हे महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. मुलगी वयात आली की तिला (Menstrual cycle) मासिक पाळी सुरु होते. दर महिन्याचा त्या तारखेला चार ते पाच दिवस (Bleeding) रक्तस्त्राव होतो. पण जर मासिक पाळी मिस झाली तर ही धोक्याची घंटा आहे. खास करुन लग्न झालेल्या (Women) महिलांनासाठी. मासिक पाळी अनियमित नाही, ती मिस होते असं मुली सांगताना आपण ऐकत असाल. गेल्या काही वर्षात ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याची कारणे वेगवेगळी आहेत. बदललेली जीवनशैली याचा मासिक पाळीवर परिणाम होतो. नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. मासिक पाळी वेळेत येणे हे महिलांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर मासिक पाळी वरच्यावर वेळेवर येत नसेल तर ही महिलांसाठी धोक्याची घंटा आहे.
पाळी मिस झाली म्हणजे नेमकं कसं ओळखायचं?
मासिक पाळीचे चक्र म्हणजे मेस्ट्रअल साइकल हे प्रत्येक महिलांचे वेगवेगळं असतं. सर्वसाधारण हे चक्र 21 ते 35 दिवसांचं असतं. काही महिलांचं मेस्ट्रअल साइकल 28, 30 किंवा 35 दिवसांचं असतं. जर तुमची साइकल ही 28 दिवसांची आहे. आणि तुम्हाला 30 दिवस झाले तरी पीरियड आले नाही. तर तुमचे पीरियड मिस आहे. पण याच चिंता करण्याची गरज नाही. पण 40 दिवसांच्या वरती तुम्हाला पीरियड आले नाही. तर तुमचे पीरियड मिस झाले आणि आता ही तुमचासाठी धोक्याची घंटा आहे.
पीरियड मिस होण्याची कारणे
1. तणाव – जर रोजच्या दिवसाला नोकरीमुळे किंवा अन्य कारणामुळे तुम्ही तणावात असाल तर तुमचे पीरियड मीस होतात. तणावामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो आणि आपले पीरियड मीस होतात. 2. गर्भाशयात गाठी – गर्भाशयात रक्ताच्या गाठी तयार होतात. त्यामुळे आपल्याला पीरियड वेळेत येत नाही. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधं उपचार करणे गरजेचं आहे. 3. वजन वाढणे – हो, बरोबर अती वजन अचानक वाढल्यामुळेही आपली मासिक पाळी मिस होते. वजन वाढल्यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात. त्याचा परिणाम आपल्या मासिक पाळीवर होतो. जास्त प्रमाणात डाएट केल्यावरही आपली पाळी मिस होते. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या. 4. PCOS किंवा PCOD – गेल्या काही वर्षांमध्ये तरुण मुलींमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही समस्या सध्या कॉमन झाली आहे. या समस्येमुळे महिलांना पीरियड लवकर किंवा उशिरा येतात. या समस्येमुळे गर्भधारणेत समस्या निर्माण होते. वेळीच सावध होऊन या समस्येबद्दल योग्य उपचार घ्या. 5. थायरॉईड – थायरॉईडमुळेही मासिक पाळीत अनियमितता येते. थायरॉईड ग्रंथी या मेटाबॉलिज्म नियंत्रित करतात. त्यामुळे याचा परिणाम आपल्या पीरियडवर होतो.
टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.
संबंधित बातम्या :
Iron : रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा
तुम्हालाही रात्री वारंवार लघवीला उठावे लागते? ही या आजाराची लक्षणे तर नाहीत…
तुम्हीही फ्रिजमधील पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा… समोर आले गंभीर परिणाम