चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात, मग ही खास बातमी तुमच्यासाठी !
ओवा (Carom Seeds) हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे, ज्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात.
मुंबई : ओवा (Carom Seeds) हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे, ज्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. ओवा चवीला तिखट, कडवट आणि किंचित तुरट असतो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात आढळतात. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते. त्यामुळे ओव्याचा (Ajwain) नैसर्गिक औषध म्हणून देखील वापर केला जातो. (Know the amazing health benefits of ajwain water)
मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? लठ्ठपणा कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी अत्यंत फायदेशीर आहे. दीड ग्लास पाण्यात एक चमचा ओवा रात्री भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी त्या पाण्यामध्ये ओवा उकळून द्या चहा सारखा त्यानंतर हे पाणी आरामात प्या. लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्या. यामुळे काही दिवसांमध्येच तुमच्या शरीरावरील चरबी कमी होईल.
-पोटदुखी, गॅस, अपचन झाल्यास ओव्यासह काळे मीठ आणि चिमूटभर हिंग घालून खाल्ले जाते. वास्तविक, ओव्यामध्ये थायमोल नावाचे एक कंपाऊंड, अँटीस्पास्मोडिक आणि कॅमेनिटिव गुणधर्म असतात, जे पोटातील वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी औषध म्हणून काम करतात
– काही लोकांचे केस अकाली पांढरे होऊ लागतात. ओवा केस अकाली पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करतो. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा कढीपत्ता, मनुका, साखर आणि ओवा घालून त्याचा काढा तयार करा. या काढ्याचे नियमित सेवन केल्यामुळे केस अकाली पांढरे होणार नाहीत.
-ओवा मुरूमं दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. यासाठी पाण्यात ओवा मिसळून पेस्ट बनवा आणि मुरुमांच्या जागी 10 ते 15 मिनिटे लावा. यामुळे त्वचेच्या आत अडकलेल्या धुळीपासून मुक्त होण्यास आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत होईल.
संबंधित बातम्या :
उन्हाळ्यात दही ठरते सुपरफूड, त्वचेपासून आरोग्यापर्यंत अनेक फायदे
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायकhttps://t.co/y89Pxceis3#VitaminD #FoodSupplement
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020
(Know the amazing health benefits of ajwain water)