व्हाइटहेड्सचा त्रास नेमका का होतो ? या घरगुती उपायांनी व्हाइटहेड्सना करा बाय-बाय
ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि पिंपल्सचा त्रास हा सर्वात सामान्य आहे. त्यापैकी व्हाईटहेड्स बाहेर पडण्याची समस्या बऱ्याच लोकांना सतावते.

नवी दिल्ली : धूळ, प्रदूषण आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या चेहऱ्यावर (skin problem) परिणाम होतो. अनेक प्रकारच्या समस्याही निर्माण होतात. मृत पेशी (dead skin) जमा झाल्यामुळे त्वचा काळी पडू लागते. याशिवाय छिद्रांमध्ये तेल आणि घाण झाल्यामुळे पिंपल्स होऊ लागतात. ब्लॅकहेड्स, (blackheads) व्हाईटहेड्स, (whiteheads)आणि पिंपल्सचा (pimples) त्रास हा सर्वात सामान्य आहेत. त्यापैकी व्हाईटहेड्स बाहेर पडण्याची समस्या बऱ्याच लोकांना सतावते. व्हाइटहेड्स का होतात आणि घरगुती उपायांनी त्वचेच्या या समस्येचा प्रभाव कसा कमी करू शकतो हे जाणून घेऊया.
व्हाइटहेड्सचा त्रास का होतो ?
व्हाईटहेड्स हे देखील एक प्रकारचा पुरळ असते जे त्वचेच्या बाहेरील भागावर येते. याला सामान्य भाषेत पिंपल्स असेही म्हणतात आणि ते बहुतांशी चेहऱ्याच्या नाकाच्या भागावर बाहेर दिसतात. जर ते काढून टाकले नाहीत किंवा कमी केले नाहीत तर ते ब्लॅकहेड्सचे रूप घेतात आणि काहीवेळा डागातही रुपांतर होऊ शकते. त्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात. तेलकट त्वचा, हार्मोनल बदल, जास्त घाम येणे आणि छिद्रांमध्ये घाण साचणे यासह अनेक कारणांमुळे व्हाइट हेड्सचा त्रास होऊ शकतो.
हे आहेत काही घरगुती उपाय
बेकिंग सोडा
एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात पाणी मिसळा. आता ते प्रभावित त्वचेवर लावा आणि थोडावेळ असेच राहू द्या. यानंतर पाण्याने धुवा. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा ट्राय करू शकता.
टी ट्री ऑईल
हे एक प्रकारचे इसेंशिल ऑईल आहे ज्यामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आणि इतर घटक असतात. यासाठी टी ट्री ऑइलचे काही थेंब खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. आता कापसाच्या मदतीने ते व्हाईटहेड्सच्या प्रभावित त्वचेवर लावा. हे उपाय रात्री करून पहा आणि दुसऱ्या दिवशी फेसवॉशने स्वच्छ करा.
लसणाचा उपाय
लसूण हे जेवणाची चव वाढवतेच, पण त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे. एका भांड्यात लसणाच्या पाकळ्यांचा रस घ्या आणि त्यात दोन चमचे पाणी टाका. तुम्हाला हवे असल्यास त्यात गुलाबजलाचे काही थेंबही टाकू शकता. आता कापसाच्या मदतीने पेस्ट त्वचेवर लावा आणि काही वेळाने कोमट पाण्याने स्वच्छ करा.