Coconut Water Health Benefits: नारळपाणी प्याल तर स्वस्थ रहाल, उन्हाळ्यात मिळतील अनेक फायदे

उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नारळ पाणी शरीराला त्वरित ऊर्जा देते. यासोबतच ते रक्तातील साखरेची पातळीही वाढू देत नाही.

Coconut Water Health Benefits: नारळपाणी प्याल तर स्वस्थ रहाल,  उन्हाळ्यात मिळतील अनेक फायदे
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 12:22 PM

नवी दिल्ली : उन्हाळ्यात शरीराला थंड (cool) ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश करतो. नारळपाणीही त्यापैकीच एक आहे. रस्त्याच्या कडेला नारळपाण्याच्या गाड्यांवरही तुम्ही ते पिण्याचा आनंद घेतला असेल. नारळाचे पाणी (coconut water) केवळ शरीरात थंडावा आणत नाही तर ते एक उत्तम एनर्जी बूस्टर देखील आहे. यासोबतच नारळाचे पाणी सेवन करणे हे रक्तातील साखर (controls blood sugar) नियंत्रित करण्यासह किडनी स्टोकचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. नारळपाणी प्यायल्याने त्वचेत चमकही येते.

नारळाचे पाणी इलेक्ट्रोलाइट्स आणि पोषक तत्वांचा नैसर्गिक स्रोत आहे आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. ते पोषक तत्वांचे भांडार आहे. उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीराला काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया.

नारळपाणी पिण्याचे 5 मोठे फायदे

हे सुद्धा वाचा

1) ब्लड शुगर नियंत्रणात राहते मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात साखरयुक्त पदार्थांऐवजी नारळपाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. नारळपाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहून मधुमेहात आराम मिळतो. नारळाच्या पाण्यात नैसर्गिक साखर असते, त्यामुळे जास्त प्रमाणात नारळ खाल्ल्याने मधुमेही रुग्णांना हानी पोहोचते. म्हणूनच त्याचे सेवन ठराविक प्रमाणात प्यावे.

2) किडनी स्टोन – नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या किडनीचे आरोग्य चांगले राहते. 2018 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, ज्या लोकांना किडनी स्टोन नाही त्यांना नारळाचे पाणी सेवन करण्यास देण्यात आले. त्यानंतर त्यांनी लघवी करताना जास्त प्रमाणात सायट्रेट, पोटॅशिअम आणि क्लोराईड गमावले. यावरून असे दिसून येते की नारळाचे पाणी किडनी स्टोन (शरीरातून) बाहेर काढण्यासाठी किंवा तयार होण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

3) हृदयाचे आरोग्य – शहाळ्याचे पाणी म्हणजेच नारळ पाणी देखील हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देऊ शकते. यामध्ये असलेले पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करते. काही अभ्यासात असे आढळून आले आहे की नारळाच्या पाण्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

4) त्वचेसाठी फायदेशीर – नारळ पाणी एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीराला डिटॉक्स करण्यासोबतच त्वचेची चमक वाढवण्यासही ते उपयुक्त आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने किंवा त्वचेवर लावल्याने मॉयश्चरायजरसारखा प्रभाव पडतो. नारळाचे पाणी नियमितपणे पिणे हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

5) स्ट्रेस, फ्री रॅडिकल्स – नारळ पाण्यात मुबलक प्रमाणात पोषक तत्वे आढळतात. पोषक तत्वांसह, त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील आहेत जे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.