थंडी आली थंडी.. लोकरीचे मोजे वापरण्यापूर्वी जाणून घ्या धुण्याची योग्य पद्धत नाहीतर…

थंडी वाढली की आपण लोकरीचे कपडे वापरायला सुरुवात करतो. पण या कपड्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. सॉक्स हे ताणले जातात त्यामुळे त्याची धुताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा हे सॉक्स लवकर खराब होण्याची शक्यता असते.

थंडी आली थंडी.. लोकरीचे मोजे वापरण्यापूर्वी जाणून घ्या धुण्याची योग्य पद्धत नाहीतर...
लोकरीचे मोजे कसे धुवाल ?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 4:53 PM

हिवाळ्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी असते त्यामुळे थंडी जाणवते. शरीर उबदार ठेवण्यासाठी लोक हिवाळ्यात लोकरीचे कपडे घालतात. लोकरीचे कपडे शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. तसेच थंड वाऱ्यापासून बचाव करतात. मात्र लोकरीच्या कपड्यांची देखभाल करणे अवघड आहे. लोकरीच्या कपड्याची लोकर निघण्याची शक्यता असते. त्यासोबतच त्याचा रंग देखील जाऊ शकतो. यामुळे लोकरीचे कपडे धुताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. स्वेटर, कार्डिगन जॅकेट किंवा कोट हे कपडे लोक अनेकदा बाजारातून ड्रायक्लिन करून आणतात. पण हिवाळ्यात लोकरीचे सॉक्स धुणे देखील अत्यंत आवश्यक आहे. कारण सॉक्स हे इतर कपड्यांपेक्षा लवकर खराब होतात. सॉक्स नीट न धुतल्यामुळे लोकरीचे सॉक्स लवकर खराब होतात आणि ते जास्त दिवस घालता येत नाही. गाठी येऊ शकतात त्यांचा रंग पिका होऊ शकतो. सॉक्सची इलॅस्टिक खराब होऊ शकते म्हणजेच ते सैल होऊ शकतात. यामुळे हिवाळ्यात सॉक्स धुताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे महागडे सॉक्स पुढच्या हिवाळ्यातही तुम्हाला कामी येतील.

पाण्याचे योग्य तापमान

लोकरीचे कपडे किंवा सॉक्स धुताना नेहमी पाण्याचे योग्य तापमान असणे आवश्यक आहे. लोकरीचे सॉक्स धुण्यासाठी तुम्ही थंड किंवा कोमट पाणी वापरू शकतात. गरम पाण्यामुळे लोकर तुटू शकते आणि त्याचा आकार बिघडू शकतो.

योग्य डिटर्जंट वापरा

कपडे खराब होण्यामागचे एक सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीचे डिटर्जंट वापरणे. हलके आणि लोकरीचे सॉक्स होण्यासाठी त्याच्या फॅब्रिकशी संबंधित डिटर्जंट वापरा. कठोर डिटर्जंट पावडर वापरल्यास सॉक्सची लोकर खराब होऊ शकते. त्यामुळे सौम्य डिटर्जंट पावडर किंवा लिक्वीड वापरा.

जास्त घासू नका

सॉक्स जास्त ताणले जातात. त्यामुळे ते धुताना हलक्या हाताने धुवा जास्त जोर लावू नका. जास्त घासल्यामुळे लोकर खराब होऊन त्याची लवचिकता निघून जाते.

धुणे आणि सुकवणे

वॉशिंग मशीन मध्ये लोकरीचे सॉक्स धुवू नका. असे केल्यास सॉक्स मध्ये गाठ निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर लोकरीचे सॉक्स उन्हात वाळवू नका. उन्हात सॉक्स वाळवल्यास त्याचा रंग जाऊ शकतो.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.