Weight Loss | सतत जंकफूड खाल्ल्यानंतरही काही लोक ‘लठ्ठ’ होतच नाहीत! जाणून घ्या या मागचे रहस्य…

वजन नियंत्रित करण्यासाठी, नेहमी व्यायामाकडे आणि अन्नाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, असे बरेच लोक आहेत, जे भरपूर प्रमाणात जंकफूड खातात आणि कोणत्याही प्रकारची कसरत देखील करत नाहीत.

Weight Loss | सतत जंकफूड खाल्ल्यानंतरही काही लोक ‘लठ्ठ’ होतच नाहीत! जाणून घ्या या मागचे रहस्य...
जंकफूड
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 4:44 PM

मुंबई : वजन नियंत्रित करण्यासाठी, नेहमी व्यायामाकडे आणि अन्नाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, असे बरेच लोक आहेत, जे भरपूर प्रमाणात जंकफूड खातात आणि कोणत्याही प्रकारची कसरत देखील करत नाहीत. असे असूनही त्यांचे वजन कधीच वाढत नाही. वाटतं ना नेहमीच आश्चर्य? चला तर, यामागील कारण काय असू शकते ते जाणून घेऊया…( Know the weight loss secret behind Why some people never gain weight even though they eat junk food)

वजन न वाढण्याचे कारण केवळ चांगली चयापचय क्रिया नाही. यामागे अशी बरीच कारणे आहेत. जसे की, आनुवंशिकता, योग्य पोषण आणि अगदी आपले वर्तन देखील शरीराचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. वजन वाढवणे किंवा नाही, हे देखील प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या दिनचर्येवर अवलंबून असते.

शरीरातील शिल्लक कॅलरी

याशिवाय, आणखी एक कारण देखील आहे जे आपल्याला कदाचित जाणून घेतल्यानंतर विचित्र वाटेल. खरं तर, काही लोक इतरांपेक्षा जास्त किंवा सम प्रमाणात अन्न खातात, परंतु प्रत्यक्षात हा त्यांचा रोजचा आहार नसतो. असे लोक घरात जेवताना कमी खाऊन इतरांसमोर अधिक खातात. शरीरातील कॅलरी शिल्लक असल्यामुळे त्यांचे वजन वाढत नाही.

घरगुती कामे

भरपूर खाल्ल्यानंतरही स्लिम राहण्याचे आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे शारीरिक हालचाली. शारीरिक क्रियाकलाप म्हणजे केवळ व्यायामशाळेत घाम गाळणे नव्हे. याचा अर्थ असा की, आपण दिवसभर चालण्यात किंवा घरात काही काम करण्यात व्यस्त आहात. घरगुती कामांमधूनही आपल्या शरीराचा व्यायाम होतो (Know the weight loss secret behind Why some people never gain weight even though they eat junk food).

अभ्यास असे दर्शवतो की, काही लोकांना जनुकीयदृष्ट्या शारीरिक क्रिया करण्याची अधिक सवय आहे. यामुळे, त्यांच्या कॅलरी सतत जळत राहतात आणि त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात असते. याव्यतिरिक्त, काही लोक इतरांपेक्षा समान व्यायाम करून कॅलरी कमी करतात. हे देखील त्यांच्या अनुवांशिक गोष्टीवर पूर्णपणे अवलंबून असते.

पीएलओएस जेनेटिक्समध्ये प्रकाशित झालेल्या 2019च्या अभ्यासानुसार, 250 पेक्षा जास्त भिन्न डीएनए लठ्ठपणाशी संबंधित आहेत. तथापि, हे प्रत्येक बाबतीत योग्य असल्याचे आढळले नाही. अभ्यासानुसार, काही लोकांचे जेनेटिक्स लठ्ठपणाचे आहेत, परंतु तरीही ते सडपातळ आहेत.

जीवनशैलीचा परिणाम

याशिवाय शरीराचा सडपातळपणा किंवा चरबी आपल्या जीवनशैलीवर देखील अवलंबून असते. आपण किती मद्यपान करता, आपण किती जंक फूड खाता, आपण किती व्यायाम करता आणि आपण किती व कशी झोप घेता, या सर्व गोष्टी आपल्या वजनावर परिणाम करतात.

म्हणूनच आपल्याला खरोखर आपले वजन नियंत्रित करायचे असेल, तर फक्त अन्नाचे प्रमाण लक्ष न घेता,  आपल्या संपूर्ण जीवनशैलीकडे लक्ष द्या. यामुळे आपले वजन योग्य प्रकारे कमी होईल आणि आपण देखील निरोगी रहाल.

(Know the weight loss secret behind Why some people never gain weight even though they eat junk food)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.