Mahashivratri 2021 | घरात शिवलिंग ठेवण्यापूर्वी वाचा महत्त्वाचे नियम, अन्यथा निर्माण होतील अनेक अडचणी!
शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जर, शिवलिंगाची पूजा नियमित केली गेली, तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
मुंबई : लवकरच महाशिवरात्रीची मोठी रात्र येणार आहे. या दिवसाला पुराणात विशेष महत्त्व आहे. अनेक लोक या या दिवशी व्रत करतात, शिवलिंगाची पूजा करतात. शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जर, शिवलिंगाची पूजा नियमित केली गेली, तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. काही लोक घरातही शिवलिंगाची प्रतिकृती ठेवतात. परंतु, शिवलिंग घरात ठेवण्याचे काही विशेष नियम आहेत, ज्याबद्दल लोकांना सहसा माहिती नसते. शिवलिंगाशी संबंधित या नियमांची काळजी घेतली गेली नाही, तर घरात ठेवलेल्या शिवलिंगामुले तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात. चला तर, याच विशेष नियमांबद्दल जाणून घेऊया…(Know this important rules before placing shivlinga at home)
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!
– घरात कधीही मोठे शिवलिंग ठेवू नका. त्याचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्याच्या वरच्या पेरापेक्षा मोठा नसावा.
– जर शिवलिंग घरात ठेवलेले असेल, तर त्याची प्राण प्रतिष्ठा करू नका. परंतु, नियमितपणे त्याची पूजा आणि अभिषेक करावा.
– एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरात ठेवली जाऊ नयेत, असे शिवपुराणात म्हटले आहे. म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करा. एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि तो मंदिरात नेऊन ठेवा किंवा नदीत विसर्जित करा.
– शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. भांड्यात शुद्ध पाणी भरुन त्यात शिवलिंग ठेवा आणि नियमितपणे त्यावर अभिषेक करा.
– जर घरात धातूचे शिवलिंग असेल, तर मग ते सोने, चांदी किंवा तांबे या धातूमध्येच तयार केले पाहिजे. त्यावर एक सर्प देखील गुंडाळलेला असावा (Know this important rules before placing shivlinga at home).
– नर्मदा नदीच्या पत्रातील दगडपासून बनलेले शिवलिंग फार शुभ मानले जाते. याशिवाय पारद शिवलिंग घरात ठेवणे देखील शुभ मानले जाते.
– ज्या ठिकाण शिवलिंग ठेवले जाते, त्या ठिकाणी भागवान शंकराच्या कुटुंबाचा एक फोटो ठेवावा. शिवलिंग कधीही एकटे ठेवू नका.
– शिवलिंग असो वा शिवाचे इतर कोणत्याही चित्र, नेहमी केतकीची फुले, तुळस, सिंदूर आणि हळद शिवाला अर्पण करू नये, हे नेहमी लक्षात ठेवावे.
– शिवलिंग घरात नेहमीच पूजास्थळावर ठेवावे. घरातील जोडीच्या बेडरूममध्ये शिवलिंग ठेवण्याची चूक करू नका. तसेच, हे स्थान मोकळे असले पाहिजे. त्यामुळे त्या जागी सकारात्मक परिणाम दिसून येतो.
– असे मानले जाते की, शिवलिंगातून प्रत्येक वेळी उर्जेचा प्रवाह सुरु असतो, म्हणून शिवलिंगावर नेहमी पाण्याचा प्रवाह ठेवावा. यामुळे ही ऊर्जा शांत होते.
(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही.)
(Know this important rules before placing shivlinga at home)
हेही वाचा :
बुद्धांची ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल, वाचा Motivational Story
MahaShivratri 2021 | तुळशीची पानं आणि केतकीचं फुलं महादेवाला वर्ज्य, जाणून घ्या या मागील पौराणिक कथाhttps://t.co/fnsSdl0Kd1#Mahashivratri2021 #tulsi #KetakiFlower #Mahadev #LordShiva
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 7, 2021