चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे तर माहीत असतीलच; आता जरा तोटेही जाणून घ्या
घरगुती उपायांनी चेहऱ्यावर चमक आणण्याचा ट्रेंड खूप जुना आहे. यापैकी एक म्हणजे आइस फेशियल, ते का केले जाते हे जाणून घेऊया.
नवी दिल्ली : अनेक महिलांना पार्लरमध्ये न जाता घरी फेशिअल (facial) करायला आवडते. कारण त्यामुळे केमिकल्स टाळता येऊ शकतात आणि ते स्वस्त असल्याने पैसेही वाचतात. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी घरी अनेक फेशिअल करता येतात, आणि त्यापैकी एक म्हणजे आइस फेशियल (ice facial) आहे. बर्याच अभिनेत्रीही आइस फेशिअल करतात, त्यानंतर ते अधिक लोकप्रिय झाले. पण आइस फेशियलचे काही तोटे (side effects) देखील असू शकतात हे तुम्हाला माहित आहे का ?
चेहऱ्याला सूदिंग इफेक्ट देण्यासाठी, डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी आपण बर्फ लावतो. आणि आता उन्हाळा आला आहे, बहुतेक लोक उन्हामुळे तणावग्रस्त त्वचेसाठी आणि त्वचेच्या इतर समस्यांसाठी चेहऱ्याला बर्फ लावतात.
आईस फेशियलबद्दल तज्ञ काय सांगतात ?
जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला थंड काहीतरी लावले तर तुमच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे सूज कमी होते. हे डार्क सर्कल्स देखील लपवते, छिद्र कमी करते आणि तुमच्या त्वचेला पुनर्जीवित करते. तुम्हीही या शर्यतीत सामील होण्यापूर्वी आणि तुमचे आईस फेशियल सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम हे जाणून घ्या की हे सर्व परिणाम उलटही होऊ शकतात आणि फार काळ टिकणारे नाहीत. हे 30 मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ काम करू शकते परंतु तेवढाच काळ प्रभाव राहतो.
तसेच, त्वचेवर खूप थंड पदार्थ लावल्याने फोड येऊ शकतात आणि तुमच्या त्वचेच्या पेशी नष्ट होऊ शकतात.
बर्फामुळे पुरळ बरं होत नाही
बर्फ लावल्याने डोळ्यांखालील पिंपल्स, सुरकुत्या किंवा डार्क सर्कल्स कमी होतात असे तुम्ही ऐकले असेल, पण हे अजिबात खरे नाही. बर्फ केवळ चेहरा तात्पुरता ठीक करतो आणि काही काळ स्टिफ दिसू शकतो परंतु बर्फ या दीर्घकालीन समस्यांसाठी काहीही करत नाही. तुम्ही बर्फाला तुमच्या स्किन केअर रूटीनचा एक भाग नक्कीच बनवू शकता, पण तुमच्या त्वचेच्या उपचारासाठी तो फार फायदेशीर ठरत नाही.
सायनस व मायग्रेनच्या रुग्णांनी रहावे सावध
सायनस आणि मायग्रेनने त्रस्त असलेल्या लोकांनी चेहऱ्यावर बर्फ चोळण्याबाबत काळजी घ्यावी कारण त्यामुळे त्यांच्या वेदना आणखी वाढू शकतात. बर्फ लावल्याने सायनस आणि मायग्रेनचा त्रास आणखी वाढू शकतो.
आईस फेशियल कसे करावे ?
15 मिनिटांसाठी फक्त चेहऱ्यावर बर्फ लावा. चेहऱ्यावर बर्फ थेट लावणे टाळणे महत्त्वाचे आहे. तो नेहमी कापड किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून वापरा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर चेहऱ्यावर बर्फअजिबात लावू नका. लक्षात ठेवा बर्फामुळे मुरुमे बरे होत नाहीत, त्यामुळे मुरुमांवर बर्फ लावू नका. तसेच काहीही वापरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे.