जांभळ्या रंगाचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाशी आहे मोठा संबंध, समृद्ध इतिहास आणि..
आंतरराष्ट्रीय महिला दिन आता अवघ्या दोनच दिवसांवर आलाय. संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळे सेलिब्रेशन केले जाते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास खूप मोठा आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या काम करताना दिसतात.
मुंबई : जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांचा सन्मान केला जातो. आज क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक क्षेत्रात महिला काम करताना दिसतात. मात्र, यासाठी महिलांना मोठा संघर्ष हा नक्कीच करावा लागलाय. 8 मार्च हा दिवस म्हणजे महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीवर प्रकाश टाकणार दिवस आहे. मुळात म्हणजे संपूर्ण जगभरात महिला दिन हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. महिला दिन म्हटले की, सर्वात अगोदर येतो तो म्हणजे जांभळा रंग. महिला दिनाचा आणि जांभळ्या रंगाचा खूप जवळचा संबंध आहे.
महिला दिनाशी संबंधित या रंगाचा इतिहास, प्रतिकात्मकता आणि त्याचा महिला चळवळीशी असलेला संबंध याबद्दल जाणून घेऊयात. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा महिलांनी मतदानाच्या हक्कासाठी लढा दिला. त्यावेळी जांभळा, पांढरा आणि हिरवा रंग हा वापरला गेला. हे तीन रंग खूप जास्त विशेष ठरले. प्रतिष्ठेसाठी जांभळा, शुद्धतेसाठी पांढरा आणि आशासाठी हिरवा रंग होता.
मुळात म्हणजे हे रंग चळवळीदरम्यान बॅनर, रिबनल, रॅलीदरम्यान परिधान केलेल्या कपड्यांमध्ये वापरले गेले होते. यासोबतच जांभळा रंग सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि अध्यात्माशी संबंधित होता. जांबळा रंग हा प्राचीन काळापासून स्त्रियांशी संबंधित आहे, त्यांना सहसा संस्कृती आणि सर्जनशीलतेचे संरक्षक म्हणून पाहिले जाते.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा अधिकृत रंग म्हणून जांभळा रंग ओळखला जातो. कामाच्या ठिकाणी आणि राजकारणातील महिलांच्या उपलब्धीच नव्हे तर संस्कृती आणि समाजातील त्यांच्या योगदानाचा व्यापक समर्थनासह जांबळ्या रंगाला महिला दिनानिमित्त मोठे महत्वे हे नक्कीच आहे. यामुळे महिला दिनानिमित्त जांबळ्या रंगाला महत्व आहे.
आजच्या घडीला तुम्हाला असे एकही क्षेत्र सापडणार नाही, जिथे तुम्हाला महिला या दिसणार नाहीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या पुरूषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. घरची जबाबदारी सांभाळून महिला या बाहेरही काम करतात. देशाची सेवा करण्यातही आज महिला या मागे नक्कीच नाहीत. आर्मीमध्येही मोठ्या मोठ्या पोस्टवर महिला या सर्रासपणे बघायला मिळतात.