मैत्रिणींनोsss! ‘या’ पद्धतीने बनवा भोगीची भाजी, नवरा, पोरं परत परत मागतील
Makar Sankranti Bhogi: महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने भोगीची भाजी बनवली जाते. आज भोगीनिमित्त भोगीच्या भाजीची रेसिपी जाणून घेऊया. आम्ही सांगितलेली सोपी रेसिपी वापरुन अगदी झटपट तुम्ही ही भाजी बनवू शकता. जाणून घेऊया.
Makar Sankranti Bhogi: आज भोगी आहे. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी असते. याच दिवशी भोगीची खास भाजी केली जाते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने भोगीची भाजी बनवली जाते. हे तुम्हाला माहितीच असेल. आज आम्ही तुम्हाला सोपी रेसिपी सांगून तुम्हाला घरी झटपट भोगीची भाजी कशी बनवता येईल, यासाठी मदत करणार आहोत. रेसिपी जाणून घेण्यापूर्वी भाजीचे साहित्य एकदा वाचा.
भोगीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य?
• ओल्या तुरीचे दाणे – ½ वाटी • ओल्या पावट्याचे दाणे – ½ वाटी • ओल्या हरभऱ्याचे दाणे – ½ वाटी • ओला ताजा मटार – ½ वाटी • कच्चे शेंगदाणे – मूठभर • गाजर – ¼ वाटी • घेवड्याच्या शेंगा – ½ वाटी • वांगी – 2 मध्यम • बटाटा – 1 मध्यम • काशीपुरी बोर – 7/8 • उसाचे तुकडे – 5/6 • लसणाच्या (Garlic) पाकळ्या – 12 /15 • आलं / 1 इंच • हिरव्या मिरच्या – 2 • सुकं खोबरं – 2/3 चमचे • पांढरे तीळ – 2 चमचे • खसखस- ½ चमचा • धणे – ½ चमचा • जिरे – ¼ चमचा • कोथिंबीर – मूठभर • कांदा (Onion) – 1 मधम • टोमॅटो – 1 मध्यम • तिखट – ½ चमचा • गरम मसाला पावडर – ¼ चमचा • हळद – ¼ चमचा • मीठ – चवीनुसार • तेल – आवश्यकतेनुसार • पाणी – गरजेपुरता
भोगीची भाजी कशी बनवावी?
आता भोगीची भाजी कशी बनवावी? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काहीही कठीण नाही. आधी कढईत तेल घेऊन वरील सर्व भाज्या एकत्र करून थोडं मीठ घालून चांगले परतवून घ्या.
आता लसूण, हिरवी मिरची, सुके खोबरे, तीळ, खसखस, धणे, जिरे आणि कोथिंबीरची पेस्ट बनवा. ताटात परतवलेल्या भाज्या काढून थंड होऊ द्या.
त्यानंतर कढईत तेल घेऊन राई, जिरे, कढीपत्ता, कांदा आणि तयार केलेली पेस्ट घालून चांगेल परतवून घ्या. नंतर त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर घालून परतवून घ्या.
हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून चांगले परतवून घ्या. मंद आचेवर झाकण ठेवून पेस्ट चांगल्या प्रकारे शिजू द्या.
आता त्यात परतवलेल्या भाज्या घाला. चिमूटभर मीठ घालून मिश्रण परतवून घ्या. त्यानंतर पाणी घालून भाजीला चांगलं उकडू द्या. अशा रितीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने भोगीची भाजी बनवू शकता.