150 रुपये रोज वाचवा, मुलांच्या भविष्यासाठी ‘इथे’ गुंतवा
Jeevan Tarun Policy: तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी गुंवणूक करण्याचा प्लॅन करताय का, किंवा रोज, महिन्याला काही पैसे गुंतवण्याचा विचार करताय? या दोन्ही प्रश्नावर आम्ही तुम्हाला एक उत्तम पर्याय देत आहोत, त्याने तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल. जाणून घ्या.
Jeevan Tarun Policy: पालक आपल्या मुलांच्या भविष्याविषयी नेहमी सतर्क असतात. मुलांचे शिक्षण, भविष्यातील त्यांच्य गरजा लक्षात घेऊन लहानपणापासून मुलांसाठी काही ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवणारे पालकही आहेत. आज आम्ही तुम्हाला असाच एक चांगला पर्याय मुलांच्या भविष्यासाठी सांगणार आहोत.
तुम्हाला तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तुम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या म्हणजेच LIC च्या Jeevan Tarun Policy मध्ये गुंतवणूक करू शकता. LIC ची Jeevan Tarun Policy ही नॉन लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, इंडिव्हिज्युअल, लाईफ इन्शुरन्स सेव्हिंग प्लॅन आहे.
तुम्ही LIC Jeevan Tarun Policy मध्ये गुंतवणूक करू शकता. LIC कडे गुंतवणुकीसाठी विविध पॉलिसी आहेत. यातील अनेक पॉलिसी फक्त मुलांसाठीच आखण्यात आली आहेत. LIC जीवन तरुण पॉलिसी त्यापैकीच एक. जाणून घेऊया LIC च्या Jeevan Tarun Policy बद्दल.
LIC Jeevan Tarun Policy
LIC ची Jeevan Tarun Policy ही नॉन लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, इंडिव्हिज्युअल, लाईफ इन्शुरन्स सेव्हिंग प्लॅन आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमच्या मुलांसाठी बचतीबरोबरच विम्याचा देखील फायदा मिळतो.
मुलांचे वय किती असावे?
LIC ची Jeevan Tarun Policy या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुलांचे वय 90 दिवस ते 12 वर्षे असावे. मूल 20 वर्षांचे होईपर्यंत या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करावी लागते. ही पॉलिसी वयाच्या 25 व्या वर्षी मॅच्यूअर होते.
150 रुपयांची बचत करा
LIC Jeevan Tarun Policy नुसार तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्हाला रोज 150 रुपयांची बचत करूनच Jeevan Tarun Policy या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. चला जाणून घेऊया कसे.
उदाहरणातून अगदी सोप्या पद्धतीनं समजून घेऊया. तुमच्या 12 वर्षांच्या मुलासाठी Jeevan Tarun Policy ही पॉलिसी खरेदी करून गुंतवणूक केली आहे. रोज 150 रुपयांची बचत करून तुम्ही वर्षभर या पॉलिसीमध्ये 55 हजार रुपयांची गुंतवणूक कराल. मूल 20 वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला ही गुंतवणूक करावी लागते. 8 वर्षांपर्यंत दरवर्षी 55 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही संपूर्ण 4 लाख 40 हजार 665 रुपये या पॉलिसीमध्ये गुंतवाल.
आता Jeevan Tarun Policy च्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 2 लाख 47 हजारचा बोनस मिळणार आहे. यासोबतच 97 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस मिळणार आहे. त्यानुसार मूल 25 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला 8 लाख 44 हजार 500 रुपये मिळतील, ज्यात तुमची गुंतवणूक फक्त 4 लाख 40 हजार 665 रुपये असेल.