या टिप्स कुणीच सांगितल्या नसतील… पार्टनरसोबतचं नातं कसं भक्कम करायचंय?
आपल्या नात्यांमध्ये गोडवा टिकवण्यासाठी आणि दुरावा टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आम्ही दिल्या आहेत. अपेक्षा कमी करणे, पुरेसा वेळ देणे, संवाद साधणे, कौतुक करणे, रागावर नियंत्रण ठेवणे, रोमान्स वाढवणे आणि खोटे बोलणे टाळणे आदी टिप्सचा यात समावेश आहे. या सोप्या पद्धती वापरून आपण आपल्या नात्यांना मजबूत करू शकतो आणि आयुष्य आनंदी बनवू शकतो.
नातं हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. मैत्री असो की कुटुंब किंवा पत्नी सोबतचं नातं, प्रत्येक नात्यात गोडवा असतो. त्यातून आनंद मिळतो. पण अनेकदा कळत नकळत या नात्यात मिठाचा खडा पडतो. नात्यात दुरावा निर्माण होतो. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीही नात्यात दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतात. त्याची आपल्याला कल्पनाही नसते. कधी कधी तर नातं तुटण्यापर्यंत जातं. आज याच नात्यात गोडवा कसा राहिला पाहिजे आणि नातं जपण्यासाठी काय करावं आणि काय करू नये यावरच आपण चर्चा करणार आहोत.
अधिक अपेक्षा ठेवू नका
कोणत्याही नात्यात अधिक अपेक्षा ठेवल्यास त्या घातक ठरतात. कारण प्रत्येक व्यक्तीची आपली मर्यादा असते. त्याच्या काही पडत्या बाजू असतात. एखाद्या व्यक्तीकडून आपण प्रमाणाबाहेर अपेक्षा केल्या आणि त्यात तो पूर्ण करू शकल नाही तर नात्यात गोडवा राहत नाही. खटके उडण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपल्या पार्टनरला आहे तसं स्वीकार करा. त्याच्याकडून अधिक अपेक्षा ठेवू नका.
पार्टनरला वेळ न देणं
प्रत्येक नात्यात वेळेला महत्त्वं असतं. पार्टनरला वेळ न दिल्याने नात्यात कटुता येते. त्यामुळे पार्टनरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करा. महिन्यातून एकदा सिनेमाला जाणं, शॉपिंग करणं, डिनरला जाणं आदी गोष्टी केल्या पाहिजे. मग घरी का होईना पण कँडलाईट डिनर घ्या. ट्रिपला जाण्याचा प्लान करा. त्यामुळे तुमच्यातील नातं घट्ट होतं.
संवाद खुंटू देऊ नका
संवादाचा अभाव हे नात्यात दुरावा कमी होण्याचं मेन कारण आहे. तुम्ही पार्टनरसोबत बोला. त्याच्या किंवा तिच्या अडचणी समजून घ्या. तसेच संवाद राहिल्याने गैरसमज होण्यापासून दूर होतात.
कौतुक करा
नातं टिकवायचं असेल आणि सुसंवाद ठेवायचा असेल तर एकमेकांची कदर करा. एकमेकांचं कौतुक करा. छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक केल्याने नात्यात सुसंवाद राहतो. जोडीदाराच्या छोट्या गोष्टीचंही कौतुक केल्यास त्याला बरं वाटतं. त्याला छोटी मोठी गिफ्ट्स द्या.
रागावर नियंत्रण
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण ठेवा. रागावर नियंत्रण नसेल तर शब्दांवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती कायमची दुखावली जाऊ शकते. राग आला असेल तर घराबाहेर जा. राग शांत झाल्यावरच घरी या आणि पार्टनरला काय चुकलं आणि काय केलं पाहिजे हे समजावून सांगा. विशेष करून पार्टनरला सर्वांसमोर ओरडू नका.
रोमान्स वाढवा
पती-पत्नीचं नातं मजबूत करायचं असेल तर रोमान्स वाढवला पाहिजे. रोमान्समध्ये कमतरता असेलत र पार्टनरची चिडचिड होते. त्यांचं मानसिक आरोग्य बिघडतं. रोमान्स नसेल तर नात्यात दुरावा निर्माण होतो.
खोटं बोलू नका
नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. विश्वास असल्यावर तिथे खोटं बोलणं टाळा. एक गोष्ट लपवण्यासाठी खोटं बोलला तर दुसरी गोष्ट खोटी बोलावी लागेल. त्यामुळे खोटं बोलणं टाळा.