हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी बनवा जिंजर कँडी, जाणून घ्या रेसिपी
बदलत्या हवामानात सर्दी, खोकला, घसा दुखी हे त्रास अनेकांना होत असतात. तुम्हालाही हे त्रास होत असतील तर औषधी घेण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय करू शकता. घरी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही आल्याची कॅंडी म्हणजेच जिंजर कँडी बनवू शकता. जाणून घ्या जिंजर कँडी बनवण्याची रेसिपी.
सध्या हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये जवळपास सगळ्यांनाच सर्दी, खोकला, घसा खवखवणे हे त्रास होतात. यामुळे काही जण लगेच औषधी घेतात तर काही घरगुती उपाय करतात. पण या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी सारखे औषधी घेणे हे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे या सामान्य आजारासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता. पण काही घरगुती उपाय लहान मुलांना आवडत नाही आणि त्यांना जास्त औषधे देखील देऊ शकत नाही. यामुळे लहान मुलांना आवडेल असे औषध म्हणजे जिंजर कॅंडी. आल्यापासून बनवलेला हा पदार्थ हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर ठरेलच त्यासोबत लहान मुले देखील ते आवडीने खातील.
आलं
तुम्हालाही हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि घसा दुखीचा त्रास होत असेल तर जाणून घेऊ घरगुती उपाय. जे तुम्ही सहज घरी बनवू शकतात आणि ते साठवून देखील ठेवू शकता त्यासोबतच कुठे बाहेर जाताना सोबत नेऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान मुले देखील ते आवडीने खातील. पदार्थाचे नाव आहे जिंजर कॅंडी. जाणून घेऊया जिंजर कॅंडी बनवण्याची रेसिपी.
साहित्य
आले 100 ग्राम गूळ १ वाटी पाणी अर्धा कप लिंबाचा रस काळीमिरी पूड अर्धा टीस्पून काळे मीठ हळद पावडर अर्धा टीस्पून
कृती
जिंजर कँडी म्हणजेच आले कँडी बनवण्यासाठी आल्याचे बारीक काप करून ते मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर गॅसवर एक तवा ठेवून त्यामध्ये गुळ आणि आल्याची तयार पेस्ट टाकून गुळ वितळेपर्यंत त्याला ढवळत राहा. गुळामध्ये आता काळे मीठ, काळीमिरी आणि हळद घालून मिक्स करा. पाच ते दहा मिनिटे ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला हाताने गोल आकार द्या. तुमची जिंजर कँडी तयार आहे.
कँडी कशी साठवायची?
ही कँडी साठवण्यासाठी अगदी सोपी आहे. तुम्ही एका छोट्या भांड्यात ही कॅंडी काढून फ्रिजमध्ये ठेवू शकता किंवा कुठे बाहेर जायचे असेल तर हवाबंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही ती सहज घेऊन जाऊ शकता.