Navratri 2021 | नवरात्रीच्या दिवसात नवीन रेसिपीच्या शोधात आहात?, बनवा हेल्दी कुट्टूचा स्वादिष्ट हलवा

नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास करतात. नवरात्रीच्या या उपवासा दरम्यान अनेक जण तळलेले पदार्थ खाताता. आपण उपवासासाठी तुम्ही हलके फुलके पदार्थ बनवू शकता. यामध्ये कुट्टूचा हलवा ही सर्वात सोपी रेसिपी आहे.

Navratri 2021 | नवरात्रीच्या दिवसात नवीन रेसिपीच्या शोधात आहात?, बनवा हेल्दी कुट्टूचा स्वादिष्ट हलवा
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 11:11 AM

मुंबई : नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास करतात. नवरात्रीच्या या उपवासादरम्यान अनेक जण तळलेले पदार्थ खातात. उपवासासाठी तुम्ही हलके फुलके पदार्थ बनवू शकता. यामध्ये कुट्टूचा हलवा ही सर्वात सोपी रेसिपी आहे. कुट्टूचा हलवा बकव्याच्या पिठापासून बनवला जातो. हा हलवा सर्व प्रकारच्या सणांमध्ये बनवता येतो. हा हलवा बनवण्याची कृती रव्याची खीर बनवण्यासारखीच आहे. यासाठी बकव्याचे पीठ शुद्ध तूपात भाजले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी काही हेल्दी रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवतात कुट्टूचा हलवा.

कुट्टू हलवा रेसिपी

बकव्याचे पीठ- 1 कप बदामाचे पीठ – 2 टेस्पून साखर – 1/2 कप बदाम – 2 टीस्पून राजगिरा पावडर – 3 टेस्पून तूप – 5 टेस्पून पाणी – 1 1/2 कप

कृती

स्टेप 1 – प्रथम एका भाड्यामध्ये पाणी उकळवा

हा स्वादिष्ट हलवा बनवण्यासाठी मध्यम आचेवर एक मोठी कढई ठेवा आणि त्यात पाणी उकळा.

स्टेप 2 – सर्व पीठ तुपात तळून घ्या

यानंतर, मध्यम आचेवर एक पॅन ठेवा आणि त्यात 3 चमचे शुद्ध तूप टाका. वितळेल्या तूपामध्ये बकव्याचे पीठ, राजगिरा पावडर आणि बदामाचे पीठ घाला. हे सर्व मिश्रण सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

स्टेप 3 – भाजलेल्या पिठात उकडलेले पाणी घाला

मिश्रण सोनेरी झाल्यानंतर त्यात उकडलेले पाणी घाला आणि सतत ढवळत असताना ते चांगले मिक्स करा जेणेकरून एकही गाठ शिल्लक राहणार नाही.

स्टेप 4 – पॅनमध्ये साखर टाका

जेव्हा आपण पीठमध्ये पाणी टाकतो तेव्हा पीठ सर्व पाणी शोषून घेते, तेव्हा त्यातमध्ये साखर घाला आणि चांगले मिसळा. साखर हलव्याला छान गोडवा निर्माण करेल आणि त्याला छान रंग आणि सुगंध देईल.

स्टेप 5 – मिश्राणात तूप घाला

मिश्रण चांगले शिजल्यावर गॅस बंद करा आणि वर 2 चमचे तूप घाला. कुट्टूचा हलव्यावर बदामांचे काप टाका. कुट्टूचा हलवा खाण्यासाठी तयार आहे.

कुट्टूचे पीठाचे महत्व

कुट्टू आटा उच्च फायबरने भरलेले असते. जे तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. अधिक फायबर असल्याने उपवासाच्या दरम्यान तुम्ही कुट्टू अट्ट्याचे पदार्थ बनवून खाल्लात तर तुम्हाला जास्त भूक लागणारा नाही. तसेच तुमचं पोट भरलेले राहील. तसेच कुट्टू आटा ऐवजी तुम्ही राजगिर्‍याचे पीठ, सिंघड्याचे पीठ, देखील वापरू शकता.

कुट्टूचे पीठचे अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळताता. कुट्टूचे पीठ मधुमेहींसाठी लाभदायक असते. तसेच या पीठामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. या पीठामध्ये प्रोटीन असल्याने हाडे मजबूत करण्यासाठी मदत होते. कुट्टूचे पीठचे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असते.

इतर बातम्या :

Health Care : कमी रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा! 

‘या’ चार सवयी असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका सर्वाधिक, लगेच सवयी बदला!

Health Tips : जीवनशैलीच्या या सवयी ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात, वाचा याबद्दल!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.